गुरु ज्ञानAgroStar India
टोमॅटो पिकाला आधार देणे- का गरजेचे आहे?
🌱टोमॅटो हे महाराष्ट्रातील शेतकऱयांचे प्रमुख फळपीक आहे, टोमॅटो पिकामध्ये इतर आंतरमशागतीच्या कामामध्ये पिकाला आधार देणे एक महत्वाचे काम राहते, कारण टोमॅटो या पिकाचे खोड व फांद्या कमकुवत असतात त्यामुळे त्यांना आधाराची आवश्यकता असते.
🌱टोमॅटो पिकाला आधार दिल्यामुळे झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते.फळे भरपूर लागतात. फळे, पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्याशी संपर्क येत नाही. त्यामुळे फळे सडण्याचे आणि रोगाचे प्रमाण कमी होते. खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी करणे इ. कामे सुलभतेने करता येतात. फळ जेव्हा सुपारीच्या आकाराचे होतात, तेव्हा पिकाला आधार द्यावा, या बरोबरच खताचे व पाण्याचे योग्य नियोजन करावे. जेणेकरून चांगल्या गुणवत्तेची फळे शेतकऱ्याला मिळतील व जास्तीत जास्त उत्पादन मिळेल.
🌱संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.