AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकामध्ये बांधणीचे महत्व!
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
टोमॅटो पिकामध्ये बांधणीचे महत्व!
• टोमॅटो पिकात जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पादनासाठी झाडांना आधार देणे गरजेचे असते. • टोमॅटो पिकाचे खोड व फांद्या कमकुवत असतात त्‍यामुळे त्‍यांना आधाराची आवश्‍यकता असते. आधार दिल्‍यामुळे झाडांची आणि फांद्यांची वाढ चांगली होते. फळे भरपूर लागतात. फळे, पाने आणि फांद्या यांचा जमिनीशी व पाण्‍याशी संपर्क येत नाही. त्‍यामुळे फळे सडण्‍याचे आणि रोगाचे प्रमाण कमी होते. खते देणे, फवारणी करणे, फळांची तोडणी करणे इ. कामे सुलभतेने करता येतात. • यासाठी टोमॅटो पिकात साधारणतः ४५ ते ५० दिवसांत सुपारीच्या आकाराची फळे लागताच पिकांना आधार द्यावा व खताचे व पाण्याचे नियमितपणे नियोजन करावे. • जेणेकरून फळांचा मातीशी संपर्क न येत फळे खराब होणार नाही तसेच झाडांची एकसारखी वाढ होऊन जास्तीतजास्त उत्पादन भेटेल. • तसेच पिकात बांधणी केल्याने हवा खेळती राहून दोन ओळीत पुरेशी जागा राहते त्यामुळे औषधांचा फवारणी करण्यास हि सोपे होते. • त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मित्रांनो आपल्या टोमॅटो पिकाला आवश्य आधार द्या. बांधणी करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
14
1
इतर लेख