अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
टोमॅटो पिकातील फुलगळ समस्येचे समाधान!
➡️शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये रसशोषक किडी, बुरशीजन्य रोग, अन्नद्रव्ये कमतरता किंवा वातावरणातील बदल आणि पाण्याची अनियमितता अशा अनेक कारणांमुळे फुलगळ होत असते.
➡️यासाठी पिकामध्ये अशी समस्या दिसून येताच पिकाचे निरीक्षण करावे व नेमके कारण काय आहे समजून घेऊन योग्य त्या कीटक/बुरशीनाशकांचा वापर करावा.
➡️तसेच पाण्याचे नियनमित नियोजन करावे व अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी चिलेटेड कॅल्शिअम @१0 ग्रॅम + बोरॉन २०% @१५ ग्रॅम प्रति पंप याप्रमाणे फवारणी करावी.