AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील नुकसानकारक कीड - फळ पोखरणारी अळी!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
टोमॅटो पिकातील नुकसानकारक कीड - फळ पोखरणारी अळी!
ही कीड टोमॅटो पिकामध्ये अतिशय नुकसान करू शकते. या किडीमुळे टोमॅटो पिकाचे कमीत-कमी ३५ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. • यावेळीचा उद्रेक प्रामुख्याने पाने, फुले, फळे इत्यादी पिकाच्या प्रमुख भागांवर होतो. • या अळीचा रंग हिरवट असतो आणि बाजूला तुटक करड्या रंगाच्या असतात रेषा असतात. • या किडीची पतंग मादी झाडाच्या पानांवर अंडी घालते, तसेच घातलेल्या अंड्यांचा रंग पिवळसर असतो. जेव्हा हे अंडी उबवतात त्यापूर्वी या अंड्यांचा रंग फिकट लाल होतो. • अंड्यातून अळी बाहेर पडल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये या समुहाने राहतात व टोमॅटोच्या कोवळ्या पानांचा फडशा पाडतात. • पूर्ण वाढ झाल्यानंतर ही आणि फळे पोखरायला सुरुवात करते. या अळीच्या नियंत्रणासाठी - 👉 क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी @६० मिली 👉 फ्लूबेंडामाईड २०% डब्ल्यूजी @४० ते १०० ग्रॅम प्रति एकर प्रमाणात फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
39
17
इतर लेख