AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील तिरंगा समस्येचे नियोजन!
सल्लागार लेखअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
टोमॅटो पिकातील तिरंगा समस्येचे नियोजन!
तिरंगा मध्ये दोन प्रकार आहेत. एक तर टॉस्पो व्हायरस आहे आणि दुसरा प्रकारामध्ये फळाला एक सारखे लाल रंग येत नाही. दोन्ही प्रकार बद्दल माहिती देत आहे. ह्या टॉस्पो व्हायरससाठी खालील उपाय करावे. १. ह्या रोगाचा नियंत्रण होऊ शकत नाही. हे रोग येऊ नये म्हणून सुरुवाती पासून नियोजन करणे गरजेचे आहे. २. ह्या रोगाचा प्रसार थ्रीप्स (फुलकिडे) पासून होते. ३. सर्व बाजूने ३ दाट ओळी मक्का लावा पण रान डुक्करांचा त्रास ज्या भागात आहे त्यांनी हे उपाय टाळावे. त्यांनी खालील उपाय करावे. ४. सर्व बाजूने इंसेक्ट नेट किंवा ९०% शेडनेट (६ फूट उंच) लावा. ५. बेसल डोस मध्ये निंबोळी खत वापरा. ६. किटनाशक सोबत नीम तेल वापरल्यास चांगला नियंत्रण मिळण्यामध्ये मदत होते ७. सर्वात महत्वाचे एकरी २० ते २५ निळे चिकट सापळे सुरुवाती पासूनच लावणे गरजेचे आहे दुसरा जे प्रकार आहे त्यात एक सारखा रंग फळावर येत नाही. त्याचे कारण भरपूर आहेत १. ढगाळ वातावरण २. मागच्या वर्षी काही विशिष्ट व्हरायटी मध्ये हे प्रकार ज्यास्त होता पण व्हरायटी चा प्रॉब्लेम आहे का नाही ते अजून नक्की सांगता येत नाही. ३. फळाला लाल रंग येण्यामध्ये पोटॅशियम व बोरान चा कार्य महत्वाचा असतो त्यामुळे त्यांची कमतरता भासल्यास हे प्रकार मोठया प्रमाणात वाढत असते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
6
इतर लेख