AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील तिरंगा समस्या!
गुरु ज्ञानAgrostar
टोमॅटो पिकातील तिरंगा समस्या!
👉🏼टोमॅटोची फळे परिपक्व होत असताना आकर्षक लाल रंग न येता फळे हिरवट पांढरी व लालसर दिसतात. यालाच शेतकरी तिरंगा असे देखील म्हणतात. 👉🏼कारणे - असंतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन, हंगामानुसार योग्य वाणांची निवड न करणे, कीड-रोगांचा प्रादुर्भाव, अनियमित पाणी व्यवस्थापन, अति थंड व उष्ण तापमान, ढगाळ व धुके असलेले वातावरण, रिमझिम पाऊस या विकृतीस कारणीभूत असतात. 👉🏼उपाय - संतुलित अन्नद्रव्ये व्यवस्थापन करावे. नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर कमी करून पोटॅश, कॅल्शियम, बोरॉन युक्त खतांचा वापर करावा. तसेच रोग प्रतिबंधात्मक म्हणून सिलिकॉन, समुद्र शेवाळी अर्क घटक असलेल्या औषधांची फवारणी करावी. 👉🏼संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4
इतर लेख