AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील टूटा ॲबसोल्यूटा कीड नियंत्रण!
गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटो पिकातील टूटा ॲबसोल्यूटा कीड नियंत्रण!
🌱सध्या टोमॅटो पिकामध्ये टूटा अळीची समस्या खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भिडसावत आहे.टोमॅटो पिकातील टूटा ॲबसोल्यूटा कीड नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक नियंत्रण आवश्यक आहे.नाग अळीची समस्या पानांवर जाणवत असते. परंतु टुटा नागअळी चा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानावरती पांढऱ्या कलरच्या नागमोडी रेषा दिसतात तसेच फळाला लहान काळे छिद्र करणारी बोरर म्हणजे टुटा. या अळीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण होणे कठीण आहे म्हणून प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी सायन्ट्रानिलिप्रोल 10.26 % w/w OD घटक असणारे बेनेव्हिया 360 मिली प्रति एकर रोपे लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांमध्ये एक फवारणी आणि 20 ते 22 दिवसांमध्ये दुसरी अशा दोन फवारण्या करणे आवश्यक आहे तसेच पीक फुलोऱ्यात येताच प्लॉटमध्ये कामगंध सापळे - डेल्टा ट्रॅप एकरी 6 ते 8 बसवून पतंग अडविण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून प्रतिबंध होऊन टोमॅटो पिक नुकसान टळेल. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0
इतर लेख