AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील टूटा नागअळीची समस्या
गुरु ज्ञानAgrostar
टोमॅटो पिकातील टूटा नागअळीची समस्या
सध्या टोमॅटो पिकामध्ये टूटा अळी (Tuta Absoluta) चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ही कीड सुरुवातीच्या अवस्थेत नागअळी सारखी लक्षणे दाखवते आणि पिकाच्या वाढीवर परिणाम करते. मुख्यतः, फळ अवस्था येताच ही कीड फळ पोखरण्यास सुरुवात करते, ज्यामुळे फळ खराब होऊन उत्पादनात मोठे नुकसान होते. 👉किडीच्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना: ✅ चिकट सापळे: पिकात काळ्या रंगाचे चिकट सापळे लावल्यास प्रौढ पतंग पकडले जातात, त्यामुळे किडीची संख्या कमी होते. ✅ कामगंध सापळे (Tuta Trap): एकरी 7-8 सापळे लावल्यास नर पतंग फेरोमोनच्या वासाने आकर्षित होऊन ट्रॅपमध्ये अडकतात, यामुळे किडीचा प्रसार रोखता येतो. ✅ योग्य वेळी फवारणी: ट्रॅपमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग दिसताच योग्य किटकनाशकाची फवारणी करावी, जेणेकरून किडीचा नाश होईल. 👉यासोबत, पिकाच्या नोंदी ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळेवर करणे फायदेशीर ठरते. योग्य व्यवस्थापन केल्यास टोमॅटो पिकाचे नुकसान टाळून अधिक उत्पादन मिळवता येते.🍅 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
1
इतर लेख