गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटो पिकातील कॅटफेस समस्या नेमकी काय?
🌱टोमॅटो पिकातील कॅटफेस या विकृतीमध्ये टोमॅटोच्या फळांचा आकार मांजरीच्या तोंडासारखा होतो. याची कारणे पुढीलप्रमाणे - फुले
लागण्याच्या अवस्थेत थंड व ढगाळ वातावरण, रात्रीचे तापमान जास्त काळ कमी राहिल्यास फुलांमध्ये
परागीभवनास अडथळा निर्माण करते, फळधारणा अवस्थेत थ्रिप्स किडीचा प्रादुर्भाव, काही प्रमाणात २, ४
डी सारख्या तणनाशकाची इंज्युरी यांसारखी कारणे या समस्येस कारणीभूत ठरतात. यावर उपाय म्हणून
योग्य हंगामात योग्य वाणांची लागवड करावी. संपूर्ण झाडांना योग्य सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी
घ्यावी. नत्रयुक्त खतांचा संतुलित वापर करावा.तसेच वेळीच कीड नियंत्रित ठेवावी.
🌱संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.