AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकातील करपा रोग नियंत्रण
गुरु ज्ञानAgroStar
टोमॅटो पिकातील करपा रोग नियंत्रण
👉🏻सुरुवातीला जमिनीलगतच्या पानांवर लहान गोलसर किंवा आकारहीन तपकिरी ते काळपट रंगाचे ठिपके दिसून येतात. प्रादुर्भाव वाढल्यास हे ठिपके एकत्र येऊन मोठे तपकिरी चट्टे तयार करतात. यामुळे पानांची अन्ननिर्मिती प्रक्रिया प्रभावित होऊन पाने करपून गळतात. 👉🏻अती आर्द्र हवामानात पानांच्या पृष्ठभागावर आणि ठिपक्यांच्या कडेवर पांढऱ्या रंगाची बुरशी दिसून येते. याचा थेट परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. 👉🏻नियंत्रणासाठी उपाय: या समस्येच्या नियंत्रणासाठी हेक्साकोनॅझोल + कॅप्टन घटक असणारे 'कॅपॅसिटी' वापरणे अत्यंत प्रभावी ठरते. प्रति लिटर पाण्यात 1.5 ग्रॅम कॅपॅसिटी मिसळून तयार केलेले द्रावण पिकावर फवारावे. 👉🏻समस्येचे लवकर निरीक्षण करून वेळीच उपाययोजना केल्यास पिकाचे नुकसान टाळता येते. नियमित फवारणी आणि योग्य व्यवस्थापन यामुळे पिकांची गुणवत्ता टिकवून चांगले उत्पादन मिळवता येईल. 👉🏻संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख