सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकातील करपा रोग नियंत्रणासाठी प्रभावी उपाय!
सध्या राज्यामध्ये सातत्याने ढगाळ वातावरण,अधूनमधून येणारा पाऊस यामुळे टोमॅटो पिकामध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यातील सर्वात जास्त आढळून येणार रोग म्हणजे करपा. तर आपोज आपण करपा रोगाबद्दल जाणून घेऊया. १. लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट) - - अल्टरनेरीया सोलॅनी नावाच्या बुरशीमुळे होतो. - सुरवातीला जमिनीलगतच्या पानांवर लहान गोलाकार ते आकारहीन, तपकिरी ते काळपट रंगाचे वलयांकित ठिपके पडतात. - प्रादुर्भाव वाढून ठिपके एकमेकात मिसळून मोआकाराचे तपकिरी चट्टे पानावर तयार होतात. यामुळे पाने करपून गळतात. - पानाप्रमाणे खोडावरदेखील गर्द तपकिरी वलयांकित डाग पडतात. त्यामुळे फांद्या कमकुवत होऊन मोडतात. २. उशिरा येणारा करपा (लेट ब्लाइट) - - फायटोप्थोरा इन्फेस्टन्स नावाच्या बुरशीमुळे पाने, खोड, फांद्या आणि हिरव्या, लाल फळांवर आढळून येतो. - सुरवातीला पानावर काळपट ते फिक्कट तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात. - ढगाळ हवामानात रोगाचा प्रादुर्भाव वाढून खोड, पाने आणि फळांवर पसरून पाने करपून गळतात. - अती आर्द्र हवामानात पानाच्या पृष्ठभागावर आणि ठिपक्याच्या कडेवर पांढरी बुरशीची वाढ होते. - दोन्ही करपा रोग बियाणे व जमिनीतील बुरशीमुळे होतात. तसेच झाडाचे रोगग्रस्त अवशेष, हवा, पाणी व कीटकांमार्फत या रोगाचा प्रसार होतो. करपा रोगांचे नियंत्रण- 👉 पिकाची फेरपालट करावी. 👉 लागवडीपूर्वी रोपांवर बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. झाडावरील तसेच जमिनीवर पडलेले रोगग्रस्त फळे, पाने गोळा करून जमिनीत गाडावित अथवा जाळून नष्ट करावीत. 👉 तसेच कॉपर ऑक्सिक्लोराईड ५०% डब्लूपी @ ३ ग्रॅम किंवा किटाझीन ४८% ईसी @१ मिली प्रति लिटर किंवा झायनेब ७५% डब्लूपी @६००-८०० ग्रॅम प्रति एकर किंवा सायमॉक्सिनिल ८% + मॅंकोझेब ६४% डब्लूपी @६०० ग्रॅम प्रति एकर किंवा पायऱ्याक्लोस्ट्रोबीन ५% + मेटीराम ५५% डब्लूजी @६००-७०० ग्रॅम प्रति एकर फवारणी करावी. 👉 हि उत्पादने खरेदी करण्यासाठी ट्रॉली बॅगवरulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-084,AGS-CP-211,AGS-CP-215,AGS-CP-150&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
29
14
इतर लेख