AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटो पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी महत्वाच्या बाबी!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी महत्वाच्या बाबी!
• सध्या टोमॅटो पिकाची लागवड चालू आहे तर, जे शेतकरी टोमॅटो पिकाची लागवड करत आहेत त्यांनी टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना ८ ते १० दिवस अगोदर पाणी देऊन वाफसा स्थितीत ठेवावे. • रोपांची लागवडीच्या दिवशी वाफ्यांना परत पाणी द्यावे, जमिनीत वाफसा असतानाच रोपाची लागवड करावी. • वाकडे, चपटे. मुळे नसलेली व कोमावलेली रोपांची लागवड करू नये. • लागवड केल्यानंतर २-३ दिवसांनी पाणी द्यावे.  पाणी व्यवस्थापन • लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे व त्यानंतर २-३ दिवसात आंबवणीचे पाणी द्यावे. • पिकाच्या सुरूवातीला पाणी जास्त प्रमाणात झाल्यास पानांची व फाद्यांची वाढ जास्त होते. त्यामुळे पिकाला फुल येईतोपर्यंत पाणी अंदाजे ६० दिवसांपर्यंत द्यावे. ठिबकच्या साहाय्याने पिकाला आवश्यक तितकेच पाणी द्यावे. फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळण्याची समस्या निर्माण होते.  टोमॅटोच्या झाडांना आधार देणे • लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची वाढ झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात वाढतात त्यामुळे त्यांना बांबु, सुतळी व तार च्या साहाय्याने झाडाला बांधुन आधार दिला जातो. • जमिनीतल्या सरीच्या दोन्ही बाजूला ६ ते ८ फुट उंचीचे लाकटी बांबु जमिनीत खोलवर रोवावे व जमिनीपासुन १ मीटर अंतरावर दोन्ही खांबावर तार ओढून घट्ट बांधून बांबुना आधार द्यावा. • झाडाची उंची ३० सें.मी. झाल्यानंतर झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधुन ती तारेला बांधावी.  तणाचे नियंत्रण • लागवडीनंतर तणविरहित ठेवण्यासाठी खुरपण्या किंवा निंदनी करून घ्यावी. त्यामुळे पिकांमधील किडींचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यास मदत होते. तसेच रोग व किडींचे वेळोवेळी नियंत्रण करून पीक निरोगी ठेवावे.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
79
19
इतर लेख