AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टोमॅटोमधील ब्लॉसम एंड रॉट विकृती!
गुरु ज्ञानAgrostar
टोमॅटोमधील ब्लॉसम एंड रॉट विकृती!
🌱टोमॅटो पिकामध्ये कॅल्शिअम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये ब्लॉसम एंड रॉट होतो. हा रोग नसून एक शारीरिक विकृती आहे. ज्यामध्ये शेंड्याची वाढ खुंटून शेंडा ठिसूळ व अशक्त होतो. फळांचे देठ कमकुवत होऊन फळगळ वाढते. फळांच्या खालच्या बाजूस काळसर भाग (ब्लॉसम एंड रॉट) तयार होऊन कालांतराने हि फळे कुजून गळून पडतात. 🌱फळ नासणे, फळ बारीक होऊन सुकल्यासारखे होणे, फळे तडकणे, टिकवण क्षमता कमी होणे अशा समस्या दिसून येतात. कॅल्शिअम कमतरतेमुळे फळे तडकण्याचे प्रमाण वाढते. 🌱नियंत्रण : १. माती परीक्षणानुसार कॅल्शिअमची कमतरता असल्यास पिकाच्या सुरुवातीला लागवडीवेळेस कॅल्शिअमयुक्त खते वापरावीत. २. जमिनीमधून कॅल्शिअम नायट्रेट, सिंगल सुपर फॉस्फेट तसेच जिप्समद्वारेसुद्धा कॅल्शिअमचा पुरवठा करावा. ३. टोमॅटो पुनर्लागवडीनंतर रोपावस्था, फुलधारणा, फळधारणा या अवस्थेत चिलेटेड कॅल्शिअम ०.५ ते १ ग्रॅम किंवा कॅल्शिअम नायट्रेट ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ४. ठिबकद्वारे कॅल्शियम नायट्रेट ५ किलो २०० लिटर पाण्यामध्ये १५ दिवसाच्या अंतराने दोन वेळा विभागून सोडावे. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
2
इतर लेख