कृषि वार्तालोकमत
टोमॅटोबाबत शास्त्रज्ञांना दिले निर्देश
नवी दिल्ली: केंद्र सरकारने टोमॅटोच्या गुणवत्तेबाबत होत असलेल्या तक्रारींची दखल घेतली आहे. ही दखल घेऊन त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांना अति अधिक पौष्टिक, स्वादिष्ट व कमी पाण्यात उत्पादित होणाऱ्या टोमॅटोचे नवीन वाण विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. टोमॅटोची गुणवत्ता ठीक नसल्याने विक्रीत मोठे नुकसान सहन करावे लागत आहेत. उष्ण हवामानात टोमॅटोची योग्य प्रकारे साठवण केली जात नसल्याने टोमॅटो लवकर खराब होतात, अशा तक्रारी व्यापाऱ्यांनी अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाकडे केल्या आहेत. संदर्भ – लोकमत, ७ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
45
0
संबंधित लेख