AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टॉप 5 ट्रॅक्टर, शेतीकामासाठी दमदार आणि टिकाऊ!
कृषी यांत्रिकीकरणkrishi jagran
टॉप 5 ट्रॅक्टर, शेतीकामासाठी दमदार आणि टिकाऊ!
➡️सध्याच्या काळात शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ची आवश्यकता भासत आहे.ज्याच्या मदतीने शेतीची सर्व कामे झटपट होऊन जातात जे की ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांचा वेळ ही वाचतो तसेच कष्ट ही कमी होते. आज टॉप ५ ब्रँड ट्रॅक्टर विषयी माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही आपल्या निवडीनुसार तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता. १. महिंद्रा ट्रॅक्टर :- ➡️जगात गाजलेला ट्रॅक्टर म्हणजे महिंद्रा ट्रॅक्टर. जो की शेतीकामांसाठी सुद्धा एक नंबर आणि टिकायला सुद्धा एकदम कडक. भारतात महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर सर्वात लोकप्रिय आहेत. १५ - ७५ HP पर्यंत ३५ पेक्षा जास्त मॉडेल्स भारतात महिंद्रा ची आहेत. महिंद्रा युवो ५७५ डीआय, महिंद्रा युवो ४१५ डीआय आणि महिंद्रा जिव्हो २२५ डीआय ही महिंद्रा ची लोकप्रिय मॉडेल्स आहेत. ट्रॅक्टर च्या किमतीबद्धल बोलायचे म्हणले तर सुरुवात २.५० लाख रुपये पासून ते १२.५० लाख रुपये पर्यंत ट्रॅक्टर आहेत. २. मॅसी फर्ग्युसन लिमिटेड (TAFE) :- ➡️मॅसी फर्ग्युसन लिमिटेड ही कंपनी एक बहुराष्ट्रीय ट्रॅक्टर ची कंपनी आहे. भारतामध्ये दोन नंबर या कंपनीचे ट्रॅक्टर विकतात. यामागे कारण म्हणजे ट्रॅक्टर चे इंजिन, पॉवर, मायलेज आणि साधा लूक यामुळे शेतकरी या ट्रॅक्टर ला पसंद करतात. २५ ते ७५ HP च्या रेंज मध्ये २५ पेक्षा जास्त ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. मॅसी फर्ग्युसन २४१ डीआय महाशक्ती, मॅसी फर्ग्युसन १०३५ डीआय आणि मॅसी फर्ग्युसन ७२५० पॉवर अप हे मॉडेल्स कंपनीचे लोकप्रिय आहेत. ट्रॅक्टर च्या किमतीबद्धल बोलायचे तर ४.५० लाख ते १५.२० लाख रुपये दरम्यान ट्रॅक्टर ची किमंत आहे. ३. जॉन डीअर ट्रॅक्टर :- ➡️भारतात जॉन डीअर ट्रॅक्टर सर्वात जास्त विक्री होणार ट्रॅक्टर आहे जे की आंतरराष्ट्रीय ट्रॅक्टर च्या ब्रँड मध्ये जॉन डीअर कंपनीचे नाव घेतले जाते. 28-120 HP रेंज ३५ पेक्षा जास्त मॉडेल्स बाजारात आहेत. जॉन डीअर ५१०५, जॉन डीअर ५०५० डी, जॉन डीअर ५३१० ही कंपनीची लोकप्रिय मॉडेल्स आहेत. या ट्रॅक्टर ची सुरुवात ४.७० लाख ते २९.२० लाख रुपये पर्यंत आहेत. ४. स्वराज्य ट्रॅक्टर :- ➡️देशात सर्वात मोठी कंपनी म्हणून स्वराज्य ला ओळखले जाते. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा एक विभाग म्हणून स्वराज्य आहे. १५ HP ते ७५ HP रेंज मध्ये २० पेक्षा जास्त मॉडेल्स या ट्रॅक्टर ची आहेत. स्वराज ७३५ FE, स्वराज ७४४ FE, स्वराज ८५५ FE ही कंपनीची लोकप्रिय मॉडेल्स आहेत. ट्रॅक्टर च्या किमतीबद्धल बोलायचे म्हणले तर सुरुवात २.६० लाखापासून ते ८.४० लाख रुपये पर्यंत आहे. ५. फार्मट्रॅक ट्रॅक्टर :- ➡️आशिया खंडात सर्वात लोकप्रिय ब्रँड म्हणून फार्मट्रॅक ट्रॅक्टर कडे पाहिले जाते. फार्मट्रॅक ४५, फार्मट्रॅक ६०, फार्मट्रॅक ६०५५ क्लासिक टी२० हे मॉडेल्स कंपनीचे लोकप्रिय आहेत. तसेच या ट्रक्टर ची सुरुवात ५ लाख रुपये पासून सुरू होते तर शेवट १३.५० लाख।रुपये ला होतो. संदर्भ:-Krishi jagran, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
36
3