टू-व्हिलरवर मागे बसणाऱ्यांसाठी सरकारची नवी नियमावली!
समाचारNews 18 lokmat
टू-व्हिलरवर मागे बसणाऱ्यांसाठी सरकारची नवी नियमावली!
➡️ देशात रस्ते अपघातात सर्वाधिक जणांचा मृत्यू होतो. वाढते रस्ते अपघात पाहता, त्यात कमी आणण्यासाठी गाड्यांची बनावट आणि त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, सुरक्षितता लक्षात घेता काही नियमांमध्ये बदल केले आहेत. तसंच काही नवे नियमही लागू केले आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने टू-व्हिलर चालकांसाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. या गाइडलाइन्सनुसार, बाईक ड्रायव्हरच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना काही नियम फॉलो करावे लागतील. ड्रायव्हर सीटमागे हँड होल्ड - ➡️ गाइडलाइन्सनुसार, बाईकच्या मागील सीटच्या दोन्ही बाजूला हँड होल्ड आवश्यक आहे. हँड होल्ड बाईकवर मागे बसलेल्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आहे. बाईक चालकाने अचानक ब्रेक मारल्यास अशा स्थितीत हँड होल्ड मदतशीर आहे. आतापर्यंत अनेक बाईकमध्ये ही सुविधा नव्हती. तसंच, बाईकच्या मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूने पाय ठेवण्यासाठी पायदान अनिवार्य करण्यात आलं आहे. शिवाय बाईकच्या मागील टायरच्या डाव्या बाजूचा कमीत-कमी अर्धा भाग सुरक्षितरित्या कव्हर असावा, जेणेकरुन मागे बसणाऱ्या व्यक्तीचे कपडे मागील टायरमध्ये अडकू नयेत. कंटेनर - ➡️ बाईकला लहानसा कंटेनर लावण्याचेही निर्देश जारी करण्यात आले आहेत. या कंटेनरची लांबी 550 मिमी, रुंदी 510 मिली आणि उंची 500 मिमीहून अधिक नसावी. जर कंटेनर मागील सीटजवळ लावला, तर केवळ ड्रायव्हरलाच मंजुरी असेल. इतर कोणी बाईकवर बसू शकणार नाही. दुसरा व्यक्ती बाईकवर बसल्यास, ते नियमांचं उल्लंघन मानलं जाईल. जर कंटेनर मागील सीटच्या मागे लावला, तर दुसऱ्या व्यक्तीला बाईकवर बसण्याची परवानगी असेल. टायर - ➡️ सरकारने टायरबाबत नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. याअंतर्गत 3.5 टन वजनापर्यंतच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमचा सल्ला देण्यात आला आहे. या सिस्टममध्ये सेंसरद्वारे ड्रायव्हरला माहिती मिळेल, की गाडीच्या टायरची स्थिती काय आहे. हे लागू झाल्यानंतर गाडीमध्ये एक्स्ट्रा टायरची गरज लागणार नाही.. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- News 18 lokmat, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
6
इतर लेख