AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
टूटा नाग अळी नियंत्रण
गुरु ज्ञानAgrostar
टूटा नाग अळी नियंत्रण
🍅 सध्या सर्वात जास्त बाजारभावामुळे चर्चेत असणारे पीक म्हणजे टोमॅटो पण टोमॅटो पिकाला सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे टुटा नागअळी. नाग अळीची समस्या पानांवर जाणवत असते परंतु टुटा नागअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानावरती पांढऱ्या कलरच्या नागमोडी रेषा दिसतात तसेच फळाला लहान काळे छिद्र करणारी बोरर म्हणजे टुटा. या अळीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर नियंत्रण होणे कठीण आहे प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी -Cyantraniliprole 10.26 % w/w OD घटक असणारे बेनेव्हिया 360 मिली प्रति एकर रोपे लागवडीनंतर 10 ते 12 दिवसांमध्ये एक फवारणी आणि 20 ते 22 दिवसांमध्ये दुसरी अशा दोन फवारण्या करणे आवश्यक आहे. - पीक फुलोऱ्यात येताच प्लॉटमध्ये कामगंध सापळे - डेल्टा ट्रॅप एकरी 6 ते 8 बसवून पतंग अडविण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून प्रतिबंध होऊन टोमॅटो पिक नुकसान टळेल. 🌱संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
17
5
इतर लेख