AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
झेडपी शेतकऱ्यांना देणार सेंद्रिय शेतीसाठी अनुदान; अर्थसंकल्पात ८० लाखांची तरतूद!
कृषी वार्तासकाळ
झेडपी शेतकऱ्यांना देणार सेंद्रिय शेतीसाठी अनुदान; अर्थसंकल्पात ८० लाखांची तरतूद!
👉पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणारी सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजना जिल्हा परिषदेच्यावतीने आगामी आर्थिक वर्षातही राबविली जाणार आहे. 👉यासाठी अर्थसंकल्पात ८० लाख रुपयांच्या निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. या निधीतून सेंद्रिय शेतीसाठी प्रत्येकी ६५ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यानुसार आगामी वर्षात या योजनेंतर्गत सुमारे १२५ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळू शकणार आहे. 👉जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने २०१६-१७ या आर्थिक वर्षापासून सातत्याने सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीला यंदा पाच वर्षे पूर्ण होत असून आगामी वर्ष हे सहावे असणार आहे. 👉या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या लाभार्थी शेतकऱ्याला गाय खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ४५ हजार रुपयांचे अनुदान आणि उर्वरित २० हजार रुपये हे बायो-डायनामिक कंपोस्ट खत युनिट उभारणी, महाबिजचे मोफत ढेंचा बियाणे आणि गांडूळ कल्चरसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. 👉याशिवाय या प्रकल्पासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना सलग तीन वर्षाचे सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र आणि दोन दिवशीय सेंद्रिय शेतीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबूराव वायकर यांनी सांगितले. 👉दरम्यान, आगामी आर्थिक वर्षात कृषी विभागासाठी १२ कोटी तर, पशुसंवर्धन विभागासाठी ६ कोटी ११ लाख अशा एकूण १८ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीची तरतूद ही शेतकऱ्यांसाठी प्रस्तावित करण्यात आली आहे. 👉या निधीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी व्यक्तीगत लाभाच्या योजनांबरोबरच आदर्श कृषी ग्राम योजना, कृषी प्रदर्शन व मेळावे, कृषी सप्ताह, डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार, अपारंपरिक ऊर्जा स्रोत निर्माण करणे, सौर प्रकल्प कार्यान्वित करणे, बायोगॅस संयंत्र उभारणी आदींसह विविध योजनांसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासारख्या अधिक उपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ - सकाळ, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
28
11
इतर लेख