AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
झाडे तोडणाऱ्यांनो सावधान; एका झाडाची किंमत तब्बल ७४ लाख ५० हजार रुपये!
कृषि वार्तालोकमत
झाडे तोडणाऱ्यांनो सावधान; एका झाडाची किंमत तब्बल ७४ लाख ५० हजार रुपये!
👉शंभर वर्षाच्या जुन्या झाडांची पर्यावरणीय किंमत एक कोटी रुपयांहून अधिक निश्चित केली आहे. एका छोट्या झाडाच्या बदल्यात १०, मध्यम आकाराच्या झाडांच्या बदल्यात २५ तर मोठ्या आकाराच्या झाडांच्या बदल्यात ५० रोपे जगवण्याची जबाबदारी द्यावेत. 👉 एका झाडाची पर्यावरणीय किंमत ७४ लाख ५० हजार रुपये इतकी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या एका तज्ञ समितीने निश्चित केले आहे. 👉झाडांचे मूल्य ठरवण्यासाठी देशात प्रथमच अशा प्रकारची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत. यामुळे येत्या काळात उठसूट झाडं तोडण्याला चाप बसणार आहे. 👉शंभर वर्षाच्या जुन्या झाडांची पर्यावरणीय किंमत एक कोटी रुपयांहून अधिक निश्चित केली आहे. एका छोट्या झाडाच्या बदल्यात १०, मध्यम आकाराच्या झाडांच्या बदल्यात २५ तर मोठ्या आकाराच्या झाडांच्या बदल्यात ५० रोपे जगवण्याची जबाबदारी द्यावेत असा निर्णय समितीने दिला आहे. 👉एखाद्या प्रकल्पासाठी जर शंभराहून अधिक झाडे तोडली जाणार असतील तर आता त्यांना एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावावी लागणार आहेत. गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात सादर झालेला हा अहवाल जनसामान्यांसाठी बुधवारी जाहीर करण्यात आला आहे. 👉सदस्यांनी या अहवालात एखादे झाड निसर्गाला तो देत असलेला प्राणवायू व इतर लाभ याचे आर्थिक मूल्य विचारात घेतले आहे. हा अहवाल सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवण्यात आला होता. 👉टायगर एन्व्हायरमेंट सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक निशिकांत मुखर्जी, टायगर सेंटर फॉर सायन्स अँन्ड एन्व्हायरमेंटचे व्यवस्थापकीय संचालक व सचिव व सचिव सोहम पंड्या, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटचे संचालक सुनीता नारायण, पश्चिम बंगालच्या आरओबीचे युनिटचे मुख्य सहाय्यक अभियंता बिलवेशकुमार माझी आणि नोर्थ २४ परगण्याचे विभागीय वन अधिकारी निरंजीता मित्रा या पाच जणांच्या तज्ञ सदस्यांच्या समितीने हा अहवाल दिला आहे. 👉अशा प्रकारची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आल्यामुळे येत्या काळात उठसूट झाडं तोडण्याला चाप बसणार आहे. संदर्भ - लोकमत , यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
17
4
इतर लेख