AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 1500 रुपये!
योजना व अनुदानAgroStar
ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 1500 रुपये!
➡️राज्यातील निराधार आणि वंचित ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी, महाराष्ट्र सरकार श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबवते.या योजनेअंतर्गत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹1500 निवृत्तीवेतन दिले जाते. ➡️योजनेचे उद्दिष्ट - ज्येष्ठ नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. - त्यांना वृद्धापकाळात आर्थिक सहाय्य प्रदान करणे. - त्यांचे जीवनमान सुधारणे. ➡️योजनेचे लाभार्थी - 65 वर्षांवरील निराधार ज्येष्ठ नागरिक. - महाराष्ट्र राज्याचे किमान 15 वर्षांपासून रहिवासी. - वार्षिक उत्पन्न ₹21,000/- पेक्षा कमी. ➡️आवश्यक कागदपत्रे - विहीत नमुन्यातील अर्ज. - वयाचा पुरावा. - महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा पुरावा. - आधार कार्ड, रेशनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक पासबुक. - उत्पन्नाचा दाखला. - दारिद्र्यरेषेखालील (BPL) असल्याचा दाखला (जर असेल तर). ➡️कसा करावा? ज्येष्ठ नागरिक संबंधित तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा सेतु केंद्रात अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाईन https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Certificate या लिंकद्वारे देखील करता येतो. ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0
इतर लेख