AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जैविक खत का वापरावे? त्याचे फायदे !
जैविक शेतीAgrostar
जैविक खत का वापरावे? त्याचे फायदे !
➡️ कोणतेही पीक उत्तम यायचे असेल तर "जमिनीची सुपकता" अत्यंत महत्वाची आहे.अन्न द्रव्ये जमिनीत काही प्रमाणात उपलब्ध असतात, ते वजा जाता आवश्यक अन्न द्रव्ये पुरवावी लागतात. हे पुरवलेले अन्न घटक जसेच्या तसे म्हणजे दिलेल्या स्वरुपात पिकास "अपटेक्" "शोषण" करता येत नाहीत. म्हणून या स्वरूपास "स्थिर स्वरूप" असे म्हंटले जाते. ही अन्न द्रव्ये पिकास "अपटेक्" करण्या योग्य स्वरुपात रूपान्तर व्हावे लागते.हे रूपान्तरणाचे कार्य जमिनीतिल जीवाणु करीत असतात. ➡️ह्या विविध प्राकारच्या जीवाणुंची 'संख्या आणि कार्यक्षमता' ही अत्यंत महत्वाची असते. या साठी त्याना त्यांचे खाद्य योग्य प्रमाणात पुरवावे लागते. आणि ते म्हणजे " सेंद्रिय कर्ब " होय.जमिनित सेंद्रीय कर्बाची पातळी योग्य असावी लागते. जी आपल्या कड़े फारच कमी आहे. सरसरी 0.3 ते 0.5 एवढीच असते.ही पातळी वाढवणे साठी जैविक कर्ब द्यावा लागतो.जैविक कर्ब हा सेंद्रिय खतातून उपलब्ध होत असतो. जीवामृत, वेस्ट डी कंपोझर, इ एम ,जीवामृत स्लरी ,ऍझो, रायझो, पीएसबी हि जैविक खतेच आहेत, स्वस्त आणि कमी खर्चात ती देता येतात.या जैविक खतामुळेच किंवा जीवणूमुळेच आपल्याला उत्पन्न मिळते.आपल्या जमिनीत जिवाणू नसतील तर तुम्ही कितीही रासायनिक खते द्या उत्पन्न खूप कमी मिळते. ➡️याचे एक उदाहरण देतो ज्या जमिनीची लेव्हल केलेली असते त्या जमिनीत 2-3वर्ष उत्पन्न मिळतच नाही, कारण जसे दूध तापवून थंड झाल्यावर त्याला साय येते म्हणजे साय हा दुधाचा पौष्टीक पदार्थ असतो, तसे जमिनीत वरचा 1 विथचा जो थर असतो तो म्हणजे जमिनीचा पौ स्टिक पदार्थ असतो, त्यातच सर प्रकाचे जिवाणू असतात आणि हाच 1 विथ जमिनीचा थर लेव्हल केल्यामुळे खोल गाडला जातो व जिवाणू नसलेला मातीचा थर वर टाकला जातो .रासायनिक पदार्थ ,सेंद्रिय कर्ब यांचा झाडाला पुरवठा करणारेजिवाणू उपलब्ध नसल्यामुळे ते पदार्थ झाडाला ,पिकांना मिळत नाहीत आणि म्हणून लेव्हल केलेल्या जमिनीत 2-3 वर्ष उत्पन्न मिळत नाही 2-3वर्षानंतर नैसर्गिक रित्या जिवाणूंची वाढ झाली की अशा लेव्हल जमिनीतून उत्पन्न मिळायला लागते. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
5