सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जैविक कीड नियंत्रणातील महत्त्वाचे मित्रकीटक!
एकात्मिक कीड व्यवस्थापन' पद्धती मध्ये मित्रकीटकांच्या वापराद्वारे जैविक कीडनियंत्रण हे महत्वाचे आहे. प्राणीजगतात कीटकांचा वर्ग फार विशाल आहे. त्यात जशा हानिकारक किडी आहेत तसेच उपयुक्त कीटकही अनंत आहेत. हानिकारक व मित्रकीटक यांच्यातील गफलत टाळण्यासाठी त्यांची आपल्याला ओळख असणे आवश्यक आहे. मित्र कीटकांची ओळख:- अ) परोपजीवी कीटक - हे मित्रकीटक नुकसानकारक किडींपेक्षा आकाराने लहान व चपळ असतात. किडीच्या अंगावर किंवा शरीरामध्ये राहून त्यांना ते हळूहळू खातात व मारतात. 1) ट्रायकोग्रामा चिलोनस :- या परोपजीवी कीटकांचा उपयोग ऊस, भात, मका व ज्वारीवरील खोडकिडी, कांडी कीड, कपाशीवरील बोंड अळी, भाजीपाला पिकांवरील शेंडा व फळे पोखरणारी अळी, घाटे अळी, आदी किडींच्या नियंत्रणासाठी होतो. प्रसारण :- ५० हजार प्रौढ प्रति हेक्टर. 2) चिलोनस ब्लॅकबर्नी :- या परोपजीवी कीटकांचा उपयोग बटाट्यावरील पाकोळी, कपाशीवरील बोंड अळी व अन्य पतंगवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी होतो. प्रसारण - ५० हजार ममीज प्रति हेक्टर. 3) एनकार्शिया फॉर्मोसा :- हे कीटक भाजीपाला, फळपिके, फुलपिके व पॉलिहाऊसमधील पिकांवरील रस शोषक किडी (उदा. पांढरी माशी, मावा, उसावरील लोकरी मावा) आदींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहेत. प्रसारण - ५००० कोष प्रति हेक्टर. 4) एपिरिकॅनिया :- हे मित्रकीटक उसावरील नुकसानकारक पायरिला या किडीच्या पिल्ले व प्रौढ अवस्थांवर परजीवीकरण करतात. प्रसारण - ५० हजार अंडी किंवा ५००० कोष प्रति हेक्टर. 5) अपेंटॅलीस (कोटेशिया) :- भाजीपाला पिकातील शेंडा व फळे पोखरणारी अळी, उसावरील खोडकीड, कांडी कीड, घाटे अळी आदींच्या नियंत्रणासाठी या कीटकांचा उपयोग होतो. प्रसारण - 50 हजार प्रौढ प्रति हेक्टर. ब) परभक्षी कीटक :- हे कीटक नुकसानकारक किडीपेक्षा आकाराने मोठे व सशक्त असतात. एक परभक्षी कीटक त्याच्या जीवनात अनेक किडींचा नायनाट करतो. 1) लेडी बर्ड बीटल (ढाल किडे) :- हे परभक्षी कीटक बहुतांश पिकांवरील रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे व पिठ्या ढेकूण आदी किडींवर उपजीविका करतात. प्रसारण - २५०० प्रति हेक्टर. 2) ग्रीन लेस विंग :- या कीटकाच्या अळी व प्रौढ अवस्था या मावा, पांढरी माशी, तुडतुडे, कोळी, फुलकिडे, पिठ्या ढेकूण व बोंड अळीची अंडी, प्रथमावस्थेतील अळ्या खातात. प्रसारण - ५००० अंडी प्रति हेक्टर किंवा १० हजार अळ्या प्रति हेक्टर. 3) डिफा एफिडीव्होरा :- उसावरील लोकरी माव्याच्या प्रभावी जैविक नियंत्रणासाठी यांचा उपयोग होतो. पूर्ण विकसित अळी ३०० पेक्षा जास्त मावा किडी खाते. प्रसारण - १००० अळ्या प्रति हेक्टर.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स., हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
12
इतर लेख