AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जुन्या मोटर सायकलपासून तयार केलं शेतीचं यंत्र!
व्हायरल जुगाड ABP Live
जुन्या मोटर सायकलपासून तयार केलं शेतीचं यंत्र!
➡️ आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतीत अनेक नवनवीन बदल करत आहेत. बीड जिल्ह्यातल्या मौज येथील एका शेतकर्‍यानं शेती करण्यासाठी लागणार्‍या पेरणी आणि कोळपणी यंत्राची निर्मिती केली आहे. ➡️ बीडच्या मौज मधले बप्पासाहेब डावकर हे प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनीच शेतीमध्ये मजुरांना भेडसावणारी समस्या दूर करण्यासाठी घरांमध्ये पडून असलेली जुनी टू व्हीलर बाहेर काढली आणि त्यावरच सुरुवातीला पेरणी यंत्र जोडलं. त्यानंतर त्याच पेरणी यंत्राला सोबत फवारणी यंत्र जोडून उपयोग केला. आता तर शेतीची सगळी मशागत ते या यंत्राद्वारे करतात. ➡️ दुचाकीला जोडून तयार केलेलं हे पेरणी यंत्र. शेतात अंतरमशागत आणि इतर कामं करण्यासाठी मजुरांची टंचाई भासू लागल्यानं वेळेत शेतातली काम व्हावीत म्हणून बाप्पासाहेब डवकर या शेतकर्‍यान हे यंत्र बनवलं आहे. ➡️ अगदी कमी वेळात हे यंत्र पेरणी आणि फवारणी करत आपल्या जुन्या मोटारसायकलला थ्री व्हीलरमध्ये कन्व्हर्ट करून हे यंत्र बनवण्यात आलं. हे यंत्र बनवण्यासाठी त्यांना एक लाख दहा हजार रुपये एवढा खर्च आला असून अगदी कमी पेट्रोलमध्ये हे यंत्र शेतीची मशागत करण्यासाठी उपयोगी ठरत आहे. ➡️ पेरणी यंत्राबरोबरच त्यांनी एक कोळपणी यंत्र देखील तयार केल आहे. कमी क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांना ट्रॅक्टर आणि बैलाच्या सहाय्यानं शेती करनं परवडत नाही. त्यामुळे त्यांनी या यंत्राची निर्मिती केली आहे. पिकामध्ये वखारणी आणि कोळपणी करणं अगदी सोपं असून उभ्या पिकात देखील तण काढण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात आहे. या दोन्ही यंत्राणांवर रिवर्स गेअर बसवण्यात आला असल्यानं हे चालवण्यासाठी देखील अगदी सोपं आहे. ➡️ सुरुवातीला या यंत्राचा वापर ते स्वत: च्या शेतात पेरणी आणि मशागत करण्यासाठी करत होते. त्यानंतर परभणीच्या कृषी प्रदर्शनामध्ये त्यांनी याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि शेतकर्‍यांच्या मागणीवरून या यंत्राची त्यांनी विक्री सुरू केली आहे. याचा फायदा अनेक शेतकर्‍यांना होत आहे. संदर्भ:- ABP Live, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
20
4