AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जिवाणू खतांचे फायदे
जैविक शेतीअॅग्रोवन
जिवाणू खतांचे फायदे
• पिकांच्या उगवणीमध्ये ८ ते २२ टक्के वाढ होऊन मुळांची वाढ चांगली होते. • नत्र, स्फुरद, पालाश, गंधक व इतर मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी रासायनिक खतांची २५ ते ५० टक्के बचत होते. • पीक वाढीसाठी आवश्‍यक पदार्थांची निर्मिती करतात. उदा. जिब्रॅलिक ॲसिडमुळे उगवण शक्ती वाढते. • जमिनीची जैविक सुपीकता वाढते. • जमिनीचा पोत सुधारून पाणी वापर कार्यक्षमता वाढते. पाण्याचा ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते. • पिकांची उगवण क्षमता, फुटवे येण्याची क्षमता, मुळांची संख्या, फूल व फळ धारण करण्याची क्षमता वाढते. • उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होते, त्याची प्रत सुधारते. • द्रवरूप डिकंपोझिंग कल्चर जमिनीतील पिकांच्या उरलेल्या अवशेषांचे विघटन करतात, त्यामुळे कर्ब व नत्र यांचे गुणोत्तर सुधारते.
• काही जीवाणूंनी तयार केलेल्या प्रतिजैविकांमुळे रोगकारक बुरशीचे नियंत्रण होते._x000D_ • पिकाची रोग व कीड प्रतिकार क्षमता वाढते._x000D_ जिवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी :_x000D_ • जिवाणू खते सावलीत ठेवावीत (२५ ते ३० अंश सेल्सिअस)_x000D_ • जिवाणू खत लावलेले बियाणे रासायनिक बुरशीनाशक तसेच इतर रसायनांमध्ये मिसळू नये._x000D_ • बियाणे प्रक्रियेसाठी प्रथम बुरशीनाशक मग कीटकनाशक व त्यानंतर द्रवरूप जिवाणू खताची प्रक्रिया करावी._x000D_ • द्रवरूप जिवाणू खते वापरासंबंधी जी अंतिम तारीख दिलेली असते, त्यापूर्वीच ती वापरावीत._x000D_ संदर्भ – अॅग्रोवन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
535
2