नोकरीmarathi.latestly
जिल्हा परिषदेत मेगाभरती!
➡️ग्राम विकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद ग्रामीण आरोग्य विभाग महाराष्ट्राने गट सी पदांसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. विविध रिक्त पदे भरायची आहेत.
➡️यासाठी इच्छूक उमेदवारांनी अर्ज करावे. असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेमार्फत 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
➡️यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2021 आहे. ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता
१) B.Pharm/D.Pharm ची पदवी असणे गरजेचे आहे. तसेच MS-CIT/CCC हे संगणकीय ज्ञान असणे गरजेचे आहे.
२) आरोग्य सेवक पदासाठी 10वी उत्तीर्ण तसेच संगणकीय ज्ञान हवे.
आरोग्य सेविका पदासाठी सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद असावे. आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी आरोग्य कर्मचारी कोर्स केलेला असावा.
३) प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी B.Sc ला फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी/जूलॉजी/माइक्रोबायोलॉजी हे विषय घेऊन पदवीधर असावा.
➡️या परीक्षेसाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे असावी. ही पदे संपूर्ण महाराष्ट्र भरली जात आहेत. यासाठी नोंदणी फी खुला प्रवर्गासाठी 500 रुपये आहे. तर मागासवर्गीयांसाठी 250 रुपये आणि माजी सैनिकांसाठी मोफत असणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र 06 ते 15 ऑक्टोबर 2021 दरम्यान निघतील.
जिल्हा परिषदसाठी अर्ज करताना कागदपत्रे
➡️आधार कार्ड क्रमांक, जन्मतारीख, ईमेल आयडी, फोन नंबर, पत्ता तपशील, छायाचित्र आणि स्वाक्षरी आवश्यक आहे. SSC किंवा जन्म प्रमाणपत्रानुसार अर्जदाराचे नाव भरावे, कारण जर तुमच्या कोणत्याही अधिकृत ओळखपत्राशी नाव जुळत नसेल तर तुमचा अर्ज नाकारण्यात येईल.
अधिक माहितीसाठी - https://marathi.latestly.com/maharashtra/mega-recruitment-in-zilla-parishad-invited-applications-for-5300-seats-282944.html
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:-Marathi latestly,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.