AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जाणून घ्या, विद्राव्य खते आणि त्यांचे गुणधर्म!
सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जाणून घ्या, विद्राव्य खते आणि त्यांचे गुणधर्म!
• १९:१९:१९ :- यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत. प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी या ग्रेइचा उपयोग होतो. पीक संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जवळपास सर्व रसायनाबरोबर वापरण्यास योग्य. अन्नधान्य, भाज्या, फळे व वेलवर्गीय पिकांसाठी उपयुक्त. • १२:६१:० :- यामध्ये नत्र कमी असून पाण्यात विरघळणा-या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच फळफांद्याच्या वाढीसाठी या खताचा उपयोग होतो. कॅल्शियमयुक्त खते वगळता सर्व विद्रव्य खतांबरोबर मिसळून वापरता येते. नवीन मुळांच्या जोमदार वाढीसाठी तसेच फुलांच्या पूर्ण वाढीसाठी व तुरे येताना उपयुक्त. • ०:५२:३४ :- फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. फळांची योग्य पक्वता व रंगासाठी हे खत वापरले जाते. या विद्राव्य खतामध्ये ५२% स्फुरद व ३४% पालाश आहे. फुले लागण्याच्या व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी व आकर्षक रंगासाठी उपयुक्त. कॅल्शियमयुक्त खतांसोबत मिश्रण करता येते. • १३:०:४५ :- यात नत्राचे प्रमाण कमी व विद्रव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. पीक/फळ पक्रता अवस्थेत असताना या खताची आवश्यकता असते. फळधारणा व त्याची वाढ होत असताना फवारावे. यामुळे फळांचा आकार व त्यातील साखरेचे प्रमाण वाढते. अकाली फळगळ थांबवते. • ०:०:५० :- यामध्ये पालाश ५०% आणि गंधक १८% गंधकामुळे उत्पादनाचा दर्जा वाढतो, स्वाद येतो. कीटक/रोग यांच्या हल्ल्यास उत्तम प्रतिकार करते. तसेच पाण्याचा ताण सहून करण्यास मदत होते. फळांतील साखरेच्या प्रमाणात, आकार, दर्जामध्ये सुधारणा होते. फळ लवकर पिकते.
संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
611
102