AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जाणून घ्या, पीक लागवडीचा कालावधी, अंतर आणि एकरी बियाणे यांचा पिकावर व किडींवर कसा परिणाम होतो.
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जाणून घ्या, पीक लागवडीचा कालावधी, अंतर आणि एकरी बियाणे यांचा पिकावर व किडींवर कसा परिणाम होतो.
• पिकांमधील अंतर कमी असल्यास त्या पिकांमध्ये किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते. • पिकांमधील कमी अंतर, पिकात आर्द्रता वाढते तसेच अपुरा सूर्यप्रकाश मिळतो परिणामी किडींच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. • भात लावणी करताना दोन ओळींमधील अंतर कमी ठेवल्यास लीफ हॉपर्स आणि पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो. • ऊस पिकात दोन ओळींमधील अंतर कमी असल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव जास्त होतो.
• कापूस पिकात दोन ओळींमधील अंतर कमी असल्यास विविध रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होतो. • भुईमूग पिकात अंतर कमी असल्यास मावा किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. • पिकाच्या लागवदवीच्या कालावधीत बदल झाल्यास विविध किडींचा पिकावर प्रादुर्भाव दिसून येतो. • ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात मोहरीची पेरणी केल्यास मावा आणि सॉफ्लायचा या किडींमुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता असते. • ज्वारीची अगदी थोडी लवकर पेरणी झाल्यास शेंड माशीचा (शूट फ्लाय) प्रादुर्भाव होऊन नुकसान होते. • फेब्रुवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यात उन्हाळी मूग किंवा उडीद या पिकांची पेरणी केल्यास रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. • डिसेंबरमध्ये पुर्नलागवड केलेल्या कोबी पिकामध्ये मावा किडीचा अधिक प्रादुर्भाव होऊन नुकसान होण्याची शक्यता असते. • लवकर लागवड केलेल्या म्हणजेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागवड झालेल्या कापूस पिकात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी आढळून येतो. • ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात मका पिकाची पेरणी केल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव कमी होतो. • शिफारसपेक्षा एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे जरी जास्त ठेवल्यास शेड माशीमुळे बीयापासून नुकतेच तयार झालेले कोंब/रोपे नष्ट होतात. • अशा प्रकारे, पेरणीची शिफारस केलेली वेळ, दोन ओळीतील अंतर आणि कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांनी दिलेले बियाणे दर यांचे पालन करा आणि आपल्या पिकांचे विविध किडींपासून संरक्षण करा. संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
295
0
इतर लेख