गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जाणून घ्या, कापूस पेरणीपूर्वी आणि पेरणीच्या वेळी काय करावे जेणेकरून गुलाबी अळीचा प्रादुर्भाव कमी होऊ शकेल!
मागील वर्षी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव गंभीरपणे झाला त्या भागात यावर्षी त्याच किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कापूस पेरणीपूर्वी आणि त्याच शेतात पेरणीच्या वेळी ही समस्या सोडविण्यासाठी काही शेती पद्धती अवलंबणे आवश्यक आहेत. यासाठी आपल्याला काही आगाऊ नियोजन करावे लागेल._x000D_ • पिकाचे अवशेष नष्ट करा किंवा त्यांचा वापर सेंद्रिय खतासाठी करा._x000D_ • तसेच कापसाचे अवशेष म्हणजेच, काडी कचरा शेतात किंवा बांधावर असल्यास तो गोळा करून नष्ट करावा._x000D_ • किंवा श्रेडर मशीनच्या साहाय्याने अवशेषांचे लहान-लहान तुकडे करून सेंद्रिय खत तयार करावे._x000D_ • उर्वरित कापसाच्या काठ्यांचा वापर, कोणत्याही पिकात झाडांना आधार देण्यासाठी करू नये._x000D_ • आपल्या भागात सूत गिरणी असल्यास, पिकामध्ये फेरोमन सापळे लावावेत किंवा आपल्या शेत जवळ सूत गिरणी असल्यास ताबडतोब गुलाबी बोंड अळीचे सापळे बसवावेत._x000D_ • इंधन म्हणून आपण कापसाचे अवशेष गोळा करून ठेवले असल्यास ते व्यवस्थित प्लॅस्टिकने झाकून ठेवावे._x000D_ • कापसाच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी._x000D_ • योग्य कालावधीत कापसाची लागवड करावी._x000D_ • बीटी सोबतच नॉन बीटी (रेफ्युजी) बियाणांची लागवड करावी._x000D_ • पिकास खत आणि पाण्याचे योग्य नियोजन करावे._x000D_ • पिकामध्ये योग्य त्याच पिकाची आंतरपीक म्हणून लागवड करावी._x000D_ • पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी अ‍ॅग्रोस्टारच्या गोल्ड सर्व्हिसचा लाभ घ्यावा._x000D_ संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टारअ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स_x000D_ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!_x000D_
133
0
इतर लेख