आजचा सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
जाणून घ्या, ऊस बेणे प्रक्रिया कशी करावी व त्याचे फायदे!
लागवडीसाठी बेणे मळ्यातील १० ते ११ महिन्यांचे रसरशीत व शुद्ध बेणे वापरावे. सर्वप्रथम अशा उसाच्या एक किंवा दोन डोळ्यांच्या टिपऱ्या खांडून घ्याव्यात. त्यानंतर कार्बेन्डाझिम @२ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करून घ्यावे. टिपऱ्या या द्रावणात १० मिनिटे बुडवून काढाव्यात. रासायनिक बेणे प्रक्रियेनंतर उसाच्या टिपऱ्यांना जैविक बेणे प्रक्रिया करावी. ऍसेटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धक आणि स्फुरद विघटक जिवाणूसंवर्धकाचे मिश्रण करून उसाच्या टिपऱ्या या द्रावणात ३० मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापराव्यात. या रासायनिक व जैविक बेणे प्रक्रियेमुळे उसावर सुरवातीच्या काळात येणारे खवले कीड आणि पिठ्या ढेकूण या किडींपासून आणि जमिनीमधून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते. बेण्याची उगवण चांगली होते, रोपांची सतेज - जोमदार वाढ होते आणि परिणामी उत्पादनात वाढ होते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
99
23
इतर लेख