AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जागतिक वन्यजीव दिवस, काय आहे त्याचं महत्व!
सफलतेची कथाएबीपी माझा
जागतिक वन्यजीव दिवस, काय आहे त्याचं महत्व!
➡️जागतिक वन्यजीव दिवस हा दरवर्षी तीन मार्च रोजी साजरा केला जातोय. वनस्पती आणि प्राण्यांच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातोय. ➡️आजच्या वातावरण बदलाच्या संकटाचा पृथ्वीवरील सजीवांना मोठा सामना करावा लागतोय. त्यातच विकासाच्या नावाखाली जंगलतोड होत आहे. पृथ्वीवरील सजीवांचे अस्तित्व जर टिकवायचं असेल तर वनस्पती आणि प्राणी जीवनात समतोल आवश्यक आहे. ➡️आजच्या काळात अनेक अनेक प्राण्यांचे अधिवास नष्ट होत आहे. मनुष्याने प्राण्यांच्या अधिवासात अतिक्रमण केल्याने अनेक प्राणी पृथ्वीतलावरून नष्ट होत आहेत. त्यामुळे त्यांचे संवर्धन होणं अत्यावश्यक आहे. प्राण्यांसोबतच अनेक वनस्पतीही लयास जात असून त्यांचंही संवर्धन होणं गरजेचं आहे. ➡️प्राणी आणि वन्य जीवनावर असलेला धोका लक्षात घेता २०१३ साली संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दरवर्षी ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिवस साजरा करण्याचं ठरवलं. त्या माध्यमातून पृथ्वीवरच्या प्राणी आणि वनस्पती जीवनाविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. ➡️सध्या मनुष्याच्या अनेक कृतीमुळे प्राणी आणि वनस्पती जीवन धोक्यात आल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे त्याच्या संवर्धनाची गरज आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने CITES या संस्थेची निर्मितीही केली आहे. संदर्भ:-एबीपी माझा, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
0