AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जल जीवन अभियान योजनेंतर्गत,खेड्यांमध्ये १४.८ कोटी ग्रामीण कुटुंबांना लाभ!
कृषी वार्ताAgrostar
जल जीवन अभियान योजनेंतर्गत,खेड्यांमध्ये १४.८ कोटी ग्रामीण कुटुंबांना लाभ!
जेव्हापासून कोरोना विषाणूच्या संकटाने देशावर सावट निर्माण केली आहे, तेव्हापासून केंद्र सरकार काही मोहिमेवर कार्यरत आहे. याच भागात आता केंद्र सरकारने जल जीवन अभियान योजना सुरू केली आहे. या नव्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेत सरकार गुंतवणूकीचा विचार करीत आहे, असा विश्वास आहे. या योजनेच्या माध्यमातून सुमारे १४.८ ग्रामीण कुटुंबांच्या घरात पाण्याचे कनेक्शन देण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत २०२०-२१ मध्ये सुमारे ३० हजार कोटी रुपये राज्यांना उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. केंद्र सरकारकडून यापूर्वी सुमारे ६,४२९.९२ कोटी रुपये राज्यांना देण्यात आले आहेत. सन २०२०-२१ साठी उर्वरित रक्कम म्हणजेच २२,६९५,५० कोटी रुपयेही देण्यात आले आहेत. त्यावरून असा अंदाज लावता येतो की जवळपास २९,१२५.४२ कोटी राज्यांकडे उपलब्ध आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार ज्या राज्यांना पैशांची गरज होती, त्यांना पहिला हप्ता यापूर्वीच देण्यात आला आहे. माहितीनुसार, अर्थसंकल्पात २०२०-२१ या वर्षासाठी सरकारने ११,५०० रुपये वाटप केले होते. यासह १२ हजार कोटींचे अतिरिक्त बजेटचे वाटप करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, पीएम मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी देखील जाहीर केले की या अभियानाद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक चांगली होईल. ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. या योजनेंतर्गत शासनाकडून ५५ लिटर पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन उपलब्ध करुन देण्यात येईल,असे सांगण्यात आले आहे. त्याअंतर्गत खेड्यांमध्ये पाण्याच्या लाईन टाकल्या जातील, त्याचबरोबर जलसंधारणाचीही व्यवस्था केली जाईल. यासाठी जलसंपदा मंत्रालयाने सर्व राज्यांना या योजनेचे काम तातडीने सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संदर्भ - Agrostar १७ जून २०२०, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
188
0
इतर लेख