AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जलसंपदा विभागाला मिळणार १२,९५१ कोटी!
कृषि वार्तालोकमत
जलसंपदा विभागाला मिळणार १२,९५१ कोटी!
👉राज्याच्या जलसंपदा विभागाने पहिल्यांदा पाच आकडी निधी मिळवला आहे. यावर्षी या विभागासाठी तब्बल १२,९५१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 👉राज्यपालांचे निर्देश नसतानाही निधी मिळाला असला तरी त्याचे वाटप निर्देशानुसार असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. 👉 राज्यात जलसंपदा विभागाचे २७८ प्रकल्प सुरू आहेत. त्यामधून २६ लाख ८८ हजार ५७६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणे अपेक्षित आहे व ८,४७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण होणार आहे असे असले तरी या विभागामुळे नेमके किती क्षेत्र सिंचनाखाली आले याची आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालातून गेल्या सात ते दहा वर्षापासून देण्यातच आलेली नाही. 👉प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत २६ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित उर्वरीत किंमत २१,६९८.२१ कोटी आहे. सन २०२१-२२ या वर्षात २६ पैकी १३ प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. 👉बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत ९१ प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या प्रकल्पांची सुधारित किंमत १५,३२५.६५ कोटी आहे. यापैकी १९ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यातून १ लाख २ हजार ७७९ हेक्टर इतकी सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. 👉गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी १ हजार कोटी देण्यात आले असून हा प्रकल्प डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने धरण सुरक्षिततेसाठी धरण पुनर्स्थापना व सुधारणा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. संदर्भ -लोकमत, यासारख्या अधिक महत्वाच्या व कृषी विषयक घडामोडी जाणून घेत रहा व माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया खाली कंमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
33
5
इतर लेख