AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जमीन मोजणी झाली अचूक आणि गतिमान!
कृषि वार्ताAgrostar
जमीन मोजणी झाली अचूक आणि गतिमान!
➡️दिवसेंदिवस इंच इंच जागेला किंमत आल्याने मोजणीमध्ये गती व अचूकता यावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ लागला आहे. डिजिटल थिओडोलाईट नंतर टोटल स्टेशन या उपकरणाचा सध्या जमीन मोजणीसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. टोटल स्टेशन मध्ये इनबिल्ट डिजिटल थिओडोलाईट EDM (Electronic Distance Meter) असल्याने अचूक मोजणी शक्य होते. ➡️महाराष्ट्र शासनाच्या भूमिअभिलेख खात्याने देखील नवीन तंत्राचा वापर मोजणीसाठी सुरू केलेला आहे. मोजणी क्षेत्रात नव्याने GNSS (Global Navigation Satelite System) प्रणालीचा वापर होत आहे. यामध्ये उपग्रहाद्वारे जमिनीचे अक्षांश व रेखांश मिळविले जातात आणि संगणक प्रणालीद्वारे नकाशांचे आरेखन केले जाते. ➡️राज्यात सर्व्हे ऑफ इंडियाच्या सहकार्याने ७७ ठिकाणी कॉर्स (Contineous Operation Reference Station) उभारले आहेत. या कॉर्सच्या आधारे जीपीएस रीडींग ३० सेकंदात घेता येतात. त्यामुळे जमिनीची मोजणी ३० ते ३५ मिनिटांत करता येणे शक्य झाले आहे.मोजणी केल्यानंतर जमीन मालकांना मोजणीच्या नकाशांची "क प्रत" भूमिअभिलेख विभागाकडून देण्यात येते. ➡️ संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
5
इतर लेख