AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी वापरा हायड्रोजेल !
सल्लागार लेखKisan Raaj
जमिनीत पाणी धरून ठेवण्यासाठी वापरा हायड्रोजेल !
➡️काळानुसार शेती व्यवसायामध्ये बदल होत आहे. पिकांना वेळोवेळी पाणी देणे खूप गरजेचे आहे कारण जर त्यांना मुबलक प्रमाणात आणि योग्य वेळी पाणी न मिळाल्यास पिकाचे मोठे नुकसान होते.तर आता पिकांना पाणी देण्याचा एक नवीन आगळावेगळा मार्ग कृषी शास्त्रज्ञांनी काढला आहे. तो म्हणजे हायड्रोजेल. ➡️काय आहे हायड्रोजेल तंत्रज्ञान : हायड्रोजेल तंत्रामध्ये या गोंद पावडर चा वापर केला गेला आहे. हायड्रोजेल शेतात टाकल्यानंतर १ वर्षापर्यंत राहते. त्यानंतर हळूहळू कालांतराने त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होत जाते. मग ते जमिनीमध्ये मुरते.पावसाळ्यात पाऊस पडला तर हायड्रोजेलमध्ये वापरण्यात येणारी पावडर शोषून घेते. त्यानंतर पाणी जमिनीमध्ये खाली जात नाही. पाऊस संपल्यानंतर यामध्ये असलेला ओलावा शेत सिंचन करण्यास उपयोगी ठरतो. ➡️कसा करावा हायड्रोजेल तंत्रज्ञानाचा वापर : १.हायड्रोजेल तंत्र वापरण्यापूर्वी शेताची चांगली नांगरणी करावी लागते. त्यानंतर शेतामध्ये प्रति एकरी प्रमाणे १ ते ४ किलो हायड्रोजेल शेतीक्षेत्रात पसरावे लागते. मग पीक लागवड करण्यास जमीन तयार होते. २.बागायती लागवड करतांना वनस्पतींच्या मुळाजवळ हलका खड्डा करून हायड्रोजेल टाकावे. जेणेकरून हायड्रोजेल दुष्काळात पाणी शोषून घेऊन आद्रता सोडण्याच्या पद्धतीवर काम करेल. ३.याचे बियाणे तुम्हाला ऑनलाइन तसेच दुकानामध्ये देखील मिळते. तर हे तंत्र दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अधिक फायदेशीर ठरू शकते. ➡️संदर्भ: Kisan Raaj हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
63
13