क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
सल्लागार लेखRoyal Shetkari
जमिनीच्या पूर्व मशागतीचे महत्वाचे फायदे जाणून घ्या.
➡️ वर्षातून किमान एकदा जमिनीची मशागत करून एक महिना जमीन उन्हात तापू देणे गरजेचे आहे. जमिनीची शक्यतो हिवाळयात मशागत करून म्हणजेच खोलगट नांगरट करून मातीचा खालचा थर पृष्ठभागावर आणि पृष्ठभागावरील माती खोलीवरील थरात केली म्हणजेच जमिनीची उलथापालथ केली असता, जमिनीमधील खोलवर असलेल्या किडींचे कोष उघडे पडतात. पक्षी हे कोष खातात. हे कोष उन्हात उघडे पडल्यामुळे त्यातील किडींचे अवशेष मरतात आणि एकात्मिक कीड नियंत्रणाद्वारे किडींचा बंदोबस्त होतो. ➡️ याशिवाय मातीचे कण उन्हामुळे तापतात आणि पावसाच्या पहिल्या सरीबरोबर मातीच्या कणांचे विघटन होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. यासाठी वर्षातून एकदा जमीन किमान एक महिना चांगल्या कडक उन्हात तापवणे गरजेचे आहे. पिकांची फेरपालट करत असताना ही बाब प्राधान्याने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Royal Shetkari हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
2
संबंधित लेख