AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जमिनीची माहिती मिळवा त्वरित!
कृषी वार्ताAgrostar
जमिनीची माहिती मिळवा त्वरित!
➡️शेतीसंबंधी राज्यशासन विविध प्रकारच्या योजना आणि पद्धती विकसित करत असून जेणेकरून शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळता यावे हा त्यामागचा उद्देश आहे. बर्‍याचदा जमिनीच्या बाबतीत खरेदी-विक्रीमध्ये फसवणूकीचे प्रकार घडतात. आपल्याला माहित आहेच की जमिनीची या विषयी सगळी माहिती सातबारा उताऱ्यावर असते. त्यामुळे जमिनीचा आरसा हा सातबारा उतारा असतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या बाबतीत देखील आता शासन एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत असून लवकरच सातबारा उतारा वर क्यूआर कोड देण्यात येणार आहे. ➡️त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार असून, क्यू आर कोड स्कॅन करताच तुम्हाला संबंधित जमिनीचे किंवा सर्वे नंबर चे सगळे फेरफार उतारे, त्या जमिनीचा नकाशा आणि ती जमीन नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे याची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. ➡️भूमिअभिलेख विभागाने हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असून या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर लगेच सातबारा उताऱ्यावर क्यूआर कोड दिले जाणार आहेत. ➡️या मागचा शासनाचा उद्देश : भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाच्या माध्यमातून नकाशे, जमिनीचे फेरफार आणि सातबारा उतारे इत्यादी कागदपत्रे कम्प्युटराइज्ड करण्यात येत आहेत. तसेच जमिनीच्या मोजणी च्या बाबतीत देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या आधुनिक मोजणी पद्धतीमध्ये प्रत्येक सर्वे नंबर चे कोऑर्डिनेट निश्चित करण्यात येणार आहे. हे निश्चित केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर क्यू आर कोड प्रिंट करण्यात येईल. या सातबारा वरील क्यूआर कोड मुळे आता स्कॅन केल्यानंतर लगेचच जमिनीचे संपूर्ण माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार असल्यामुळे जमीन खरेदी विक्रीतील जे काही फसवणुकीचे प्रकार घडतात त्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
32
2
इतर लेख