AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जमिनीची निचरा सुधारण्यासाठी वापरा सबसॉयलर, मोल नांगर !
कृषी यांत्रिकीकरणAgrostar
जमिनीची निचरा सुधारण्यासाठी वापरा सबसॉयलर, मोल नांगर !
➡️ मोल नांगराद्वारे जमिनीपासून ४० ते ७५ सें.मी. खोलीवर पाइपासारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जाते, याला मोल निचरा पद्धत म्हणतात.सबसॉयलरला हा जमिनीच्या पृष्ठभागाखालून २ ते २.५ फूट चालतो. याचा तळी फोडणारा टोकदार फाळ एक फूट लांबीचा असतो. जमिनीत जाणारी मांडी ही २.५ फुटांची असते.पृष्ठभागाखाली तयार झालेला घट्ट थर फोडण्यासाठी सबसॉयलरचा वापर आवश्‍यक आहे. 👉🏻 हलक्‍या व कमी खोलीच्या जमिनीत १.५ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालवावा. भारी, खोल जमिनीत २ ते २.५ फूट खोलीपर्यंत सबसॉयलर चालतो. 👉🏻 नांगरटीपूर्वी ५ फूट अंतरावर सबसॉयलर चालवावा. सबसॉयलरने ट्रॅक्‍टरच्या अश्‍वशक्तीनुसार २ ते २.५ फूट खोलीपर्यंत नांगरट करून जमीन मोकळी केली जाते. 👉🏻 जमिनीच्या पृष्ठभागाखालील घट्ट थर फोडला जातो, त्यामुळे जमिनीत हवा भरून माती मोकळी होऊन जमीन भुसभुशीत होते. जमिनीस वाफसा लवकर येऊन हवा खेळती राहते, त्यामुळे जमिनीची मशागत चांगली खोलवर करता येते. 👉🏻 सबसॉयलरमुळे जमिनीतील जास्तीच्या पाण्याचा व क्षाराचा निचरा होतो. जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपीकता वाढण्यास मदत होते. पिकाच्या मुळांची वाढ चांगली होऊन पीक लोळण्याचे प्रमाण कमी होते. 👉🏻 सबसॉयलर चालविण्यासाठी पावसाळ्यानंतर डिसेंबर ते एप्रिल महिन्याचा कालावधी चांगला असतो. जमिनीमध्ये असणारी पाण्याची पाइपलाइन, विजेची वायर असणाऱ्या ठिकाणी अगोदर मार्किंग करून घ्यावे. ते तुटणार नाही याची दक्षता घ्यावी. 👉🏻 सबसॉयलरचा वापर खोडव्यामध्ये करताना खोडकी, जमिनीलगत छाटलेली असावी.सबसॉयलर २ ते ३ वर्षांतून एकदा वापरावा. 👉🏻 सबसॉयलरचा वापर केलेली जमीन ८ ते १५ दिवस उन्हामध्ये तापून त्यानंतरच पुढील मशागत करावी. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
11
2
इतर लेख