AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जन धन योजनेंतर्गत मिळणार अनेक फायदे!
समाचारahmednagarlive24
जन धन योजनेंतर्गत मिळणार अनेक फायदे!
➡️केंद्र सरकारकडून जनधन खातेधारकांना दरमहा हजारो रुपयांचा लाभ दिला जात आहे. वास्तविक, देशातील गरीब आणि गरजू लोकांमध्ये बँकिंग सुविधा विकसित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. ➡️विशेष म्हणजे तुमच्या जनधन खात्यात शून्य शिल्लक असूनही तुम्हाला बँकेकडून १० हजार रुपयांपर्यंतची मदत मिळू शकते. ➡️जर तुम्हाला बँकेची ओव्हरड्राफ्ट सुविधा घ्यायची असेल तर तुमचे खाते ६ महिने जुने असावे. अन्यथा तुम्हाला १० हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळू शकणार नाही. अशा स्थितीत तुम्हाला रु.२ हजारच्या पर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा नक्कीच मिळू शकते. जन धन योजनेचे फायदे – ➡️या योजनेशी संबंधित काही फायद्यांबद्दल सांगायचे तर, जन धन खात्यात जमा केलेल्या रकमेवर तुम्हाला व्याजाची सुविधा मिळते. ➡️यामध्ये तुम्ही मोफत मोबाईल बँकिंगचाही लाभ घेऊ शकता. तसेच या सरकारी योजनेतील लाभाचे पैसे थेट तुमच्या खात्यात येतात. यामध्ये १० हजार रुपयांपर्यंत ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात आली आहे. ➡️यासोबतच रुपे कार्डवर १ लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. जन धन खातेधारकाला डेबिट कार्ड देखील दिले जाते. याशिवाय तुम्ही झिरो बॅलन्सवरही खाते चालवू शकता. ➡️यामध्ये खाते उघडण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट pmjdy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन हे खाते सहज उघडू शकता. एवढेच नाही तर जन धन खाते असलेले ग्राहकही श्रम योगी मानधन योजनेच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. संदर्भ:-ahmednagarlive24, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
33
3
इतर लेख