AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांसाठी आरोग्यदायी मुक्तसंचार गोठा
पशुपालनअॅग्रोवन
जनावरांसाठी आरोग्यदायी मुक्तसंचार गोठा
• मुक्तसंचार गोठ्यामध्ये गाई, म्हशी मुक्तपणे फिरत असतात त्यामुळे त्या मानसिक ताणाखाली राहत नाहीत. त्या गरजेनुसार व आवडीनुसार चारा, पाणी पितात त्यांच्या खाण्याच्या नैसर्गिक सवयी जोपासल्या जातात. • जनावरांना व्यायाम मिळतो. प्रकृती निरोगी राहते. भूक, आहार क्षमता वाढते. स्थूलपणा कमी होऊन प्रजनन कार्यक्षमता वाढते. माजावरील गाय, म्हैस चटकन ओळखता येते. • गायी, म्हशी अधिक वेळ चारा खातात. त्या अधिक वेळ बसून विश्रांती घेऊन रवंथ करतात. त्यामुळे त्यांची अन्नद्रव्यांची पाचकता वाढते. • मजूर व चारा व्यवस्थापनावरील खर्च कमी होतो. निर्जंतुकीकरण, साफ सफाई करण्यासाठी वेळ कमी लागतो.
• गोठ्यामध्ये सोयीनुसार फेरबदल करता येतात. किरकोळ बदलासह सर्व प्रकारच्या जनावरांसाठी सर्व हंगामात उपयोगी येतात. विस्तार करण्यास सुलभ असतात. • क्षमतेपेक्षा १० ते १५ टक्के अधिक जनावरे ठराविक कालावधीकरिता सामावू शकतात. • बांधकामासाठी खर्च कमी लागतो. नुकसानीचा धोका कमी असतो. • या गोठा पद्धतीमध्ये जनावरांच्या शरीरातून होणाऱ्या बाष्पीभवनाचा वेग वाढतो. त्यामुळे गायी अधिक पाणी पितात. अॅग्रोवन
118
0
इतर लेख