AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांमध्ये होणारी जंतबाधा टाळण्यासाठी उपाययोजना !
पशुपालनAgrostar
जनावरांमध्ये होणारी जंतबाधा टाळण्यासाठी उपाययोजना !
🐄आरोग्य व्यवस्थापन उत्तम राहिले तर जनावरे आजारी पडत नाही व त्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत नाही. जनावरांना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्यामध्ये एक समस्या म्हणजे जनावरांना होणारी जंतबाधा ही होय. 🐄जनावरांना जंतबाधा झाली तर जनावरांमध्ये तीव्र स्वरूपाची पोटदुखी दिसून येते तसेच आतड्यांमध्ये जर जंतू वाढले तर अन्न तुंबून राहते अन्नाचे नीट पचन होत नाही. 🐄जनावरांमध्ये रक्त घटकांचे प्रमाण कमी कमी होत जाते व जनावरांमध्ये अंतर्गत स्वरूपाचा रक्तस्राव देखील होतो. अशा अनेक प्रकारच्या समस्या जंतबाधेमुळे निर्माण होतात. या लेखात आपण जनावरांना जंतबाधा होऊ नये म्हणून काही प्रतिबंधात्मक उपाय पाहू. 🐄प्रतिबंधात्मक उपाय : 1- वातावरणामध्ये होणारे अचानक बदल जसे की, पाऊस, थंडी इत्यादीपासून जनावरांचे संरक्षण करावे. 2- जनावरांचे आहार व्यवस्थापन करताना आहारामध्ये सूक्ष्म खनिजे, जीवनसत्वे, प्रथिने आणि कर्बोदके यांचा योग्य प्रमाणामध्ये वापर करून जनावरांना संतुलित आहार खायला घालावा तसेच प्यायला देखील स्वच्छ व मुबलक स्वरूपाचे पाणी द्यावे. 3- जनावरांचा गोठा हा कोरडा, स्वच्छ व नेहमी हवेशीर राहील याची काळजी घ्यावी. गोठा निर्जनतुक ठेवण्यासाठी वेळोवेळी योग्य औषधांचा वापर करावा. जंतांचा प्रसार ज्या कीटकांमार्फत होतो त्यांचा प्रसार नियंत्रणात ठेवावा. 4- जेव्हा जंत निर्मूलन मोहीम राबवाल तेव्हा ती विभागातील सर्व जनावरांची एका वेळेस राबवावी. त्यामुळे नव्याने होणाऱ्या जंत बांधेला थांबवता येऊ शकते. 5-आजाराची लक्षणे जनावरांमध्ये दिसली तर पशुवैद्यकाकडून सल्ला घ्यावा व रक्त, लघवी व शेण यांची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करून आजाराचे निदान करावे. 6- आजारी आणि अशक्त तसेच बाधित जनावरे इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे. 7- ज्या जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते अशा जनावरांमध्ये कृमींचा प्रादुर्भाव आपोआप कमी होत असतो. त्यांच्यावर कोणताही तणाव नसावा. 🐄संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
2
इतर लेख