AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांमध्ये प्राथमिक व सूक्ष्म खनिज मिश्रणाचे महत्व
पशुपालनNDDB
जनावरांमध्ये प्राथमिक व सूक्ष्म खनिज मिश्रणाचे महत्व
दुधाळ जनावरांमध्ये शारीरिक वाढीसाठी किंवा त्यांच्या विकासासाठी खनिज मिश्रणाची गरज असते. ज्या खनिजांची अधिक प्रमाणात आवश्यकता असते त्याला मुख्य खनिजे व ज्यांची कमी प्रमाणात आवश्यकता असते त्यांना सूक्ष्म खनिजे म्हणतात.मुख्य खनिज मध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम,फॉस्फरस, पोटॅशिअम,सोडियम,क्लोरीन ,सल्फर आणि सूक्ष्म खनिजमध्ये लोह, तांबे, मॅगनीज, जस्त,आयोडीन, ,कोबाल्ट, सेलिनीअम असते. खनिजांचे कार्य कॅल्शिअम • अधिक दुध उत्पादनासाठी आवश्यक • हाडांच्या निर्मितीसाठी आवश्यक • मांस पेशीमध्ये लवचिकतेसाठी आवश्यक. फॉस्फरस • जनावरांच्या शरीरामध्ये ऊर्जानिर्मितीसाठी आवश्यक मॅग्नेशिअम • कार्बोहायड्रेट व प्रथिनाच्या निर्मितीसाठी आवश्यक कॉपर • हिमोग्लोबिन च्या निर्मितीसाठी आवश्यक • प्रजनन कार्यासाठी आवश्यक झिंक • जनावरांमध्ये शुक्राणू निर्मितीसाठी आवश्यक • त्वचा व पेशींच्या सामान्य कार्यप्रणालीसाठी आवश्यक मॅगनीज • कार्बोहायड्रेट निर्मितीसाठी आवश्यक • फॅटीअॅसिड निर्मितीसाठी आवश्यक आयोडीन • थायरोईड निर्मितीसाठी आवश्यक • जनावरांच्या निर्मितीसाठी आवश्यक कोबाल्ट • रवंथच्या वेळेस विटामिन बी १२ च्या निर्मितीसाठी आवश्यक • हिमोग्लोबिन निर्मितीसाठी आवश्यक Source: एनडीडीबी
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
298
0
इतर लेख