AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांमधील आम्लीयता (अॅसिडिटी) होण्याची कारणे त्याचे उपचार
पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांमधील आम्लीयता (अॅसिडिटी) होण्याची कारणे त्याचे उपचार
गाय, म्हशी, मेंढ्या आणि बकरी या जनावरांमध्ये चयापचनाची समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. या समस्येला अॅसिडिटी म्हणून देखील ओळखले जाते, ज्याला इंग्रजीमध्ये 'रुमीनल अॅसिडोसिस' नावाने देखील ओळखले जाते. या चाऱ्यामुळे अॅसिडोसिसची समस्या उध्दभवते. गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ, मका, बार्ली, डाळी आणि डाळींचे पीठ आणि ब्रेड, गूळ, द्राक्षे, सफरचंद, बटाटे, शिजलेले तांदूळ हे मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने हा आजार संभवतो
रोगाची लक्षणे: • या आजाराची लक्षणे जनावराने किती कार्बोहायड्रेट सेवन केले आहेत यावर अवलंबून असतात. • सुरुवातीला, जनावर सुस्त आणि कमकुवत दिसते, अन्न चघळणे (रवंथ) थांबवते. • जनावर थोडा वेळ बसून उभी राहिलेली दिसतात. तसेच दुग्ध उत्पादन कमी झालेले दिसते. • जनावरांची कवटी सैल होते आणि आंबट वास येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. • जनावरे लंगडी हालचाल करतात, जास्त कार्बोहायड्रेट सेवन केल्यास हा रोग गंभीर होतो आणि उपचारा अभावी जनावरे दगावतात. घरगुती उपचार:- घरगुती उपचारांमध्ये, २०० ते ३०० ग्रॅम बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून त्वरित नळीद्वारे दिल्यास जनावरास आराम मिळतो. आणखी काही गंभीर लक्षणे आढळल्यास जवळच्या पशुवैद्याशी त्वरित संपर्क साधावा. संदर्भ:– अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
119
0
इतर लेख