AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांना लसीकरण योग्य वेळी करणे गरजेचे!
गुरु ज्ञानAgrostar
जनावरांना लसीकरण योग्य वेळी करणे गरजेचे!
👉🏻जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता ठरलेल्या वेळी वेळापत्रकानुसार वेळोवेळी लसीकरण करावे. 👉🏻 लसीकरणाचा फायदा: • रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न पहाता वेळापत्रकानुसार लसीकरण करावे. • रोगाची साथ येण्याअगोदर लसीकरण केल्यामुळे दोन ते तीन आठवडे रोग प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लागतात. त्यामुळे रोगाची साथ येण्याअगोदरच जनावरांच्या शरीरामध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होते. पुढे होणारे नुकसान टाळता येते. 👉🏻 लसीकरणासाठी योग्य वय: • घटसर्प व फऱ्या रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण सहा महिन्यांची वासरे किंवा मोठ्या वयाच्या जनावरांत करावे. • लाळ खुरकूत रोगाचे लसीकरण जर वासराच्या आईला केले नसेल, तर सहा ते सात आठवडे वयाची वासरे आणि त्यापुढील जनावरांना करावे. • आंत्रविषार रोग नियंत्रणाची लस वासराच्या आईला दिली नसेल, तर ती वासराच्या पहिल्या आठवड्यात द्यावी. लस दिली असेल तर चार ते सहा आठवडे वयाच्या वासराला द्यावी. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर घ्यावयाची काळजी • आजारी जनावरांना निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवून जागेवरच चारा, पाणी द्यावे. चाऱ्यासाठी बाहेर सोडू नये. • डबके, नदीनाल्यातील पाणी पाजू नये. • रोगाचा संसर्ग झालेल्या जनावरांवर वेळेत उपचार करावेत. • रोगाची साथ आलेल्या भागात जनावरे नेऊ नयेत. त्या भागातील जनावरे इतर ठिकाणी नेऊ नयेत. • रोगाची साथ आलेल्या भागातील बाजार, प्रदर्शने बंद ठेवावीत. • मेलेले जनावर तसेच दूषित मलमूत्र, चारा यांची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी. • जनावरांच्या गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे. 🌱संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
0
इतर लेख