AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यातून मिळते उच्च प्रतीचे खत !
पशुपालनAgrostar
जनावरांच्या मुक्त संचार गोठ्यातून मिळते उच्च प्रतीचे खत !
➡️मुक्त संचार गोठ्यात जनावरांचे संगोपन करत असताना शेतकऱ्यांचे कष्ट देखील कमी होतात. यासोबतच जनावरांचे आरोग्य उत्तम राहून, दूध उत्पादनात वाढ दिसून येते. शेतकऱ्यांनी दुधाळ जनावरांची संख्या मर्यादित ठेवण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मजुरांची कमतरता. पण मुक्त संचार गोठ्यात मजुरांचा प्रश्नच निर्माण होत नाही. मुक्त संचार गोठ्यात जनावरांचे संगोपन करत असताना शेतकऱ्यांचे कष्ट देखील कमी होतात. यासोबतच जनावरांचे आरोग्य उत्तम राहून, दूध उत्पादनात वाढ दिसून येते. ➡️एका गायीला किंवा म्हशीला मुक्त संचार गोठ्यात मोकळे सोडण्यासाठी कमीत कमी १५० ते २०० चौरस फुट जागेची गरज असते. याचाच अर्थ एक गुंठा जमिनीत आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो.पारंपरिक पद्धतीच्या गोठ्यामध्ये शेतकऱ्यांना दिवसातून दोन ते तीन वेळा शेण उचलावे लागते. मुक्त संचार गोठ्यामध्ये मात्र दोन महिन्यातून एकदा किंवा पावसाळ्याआधी शेणखत काढले जाते. यामध्ये जनावरांचे मुत्र मिसळले गेल्याने तसेच जनावरांच्या खुरांनी हे खत तुडविले गेल्याने उत्तम प्रतीचे गोखूर खत मिळते. जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब आणि पीक गुणवत्ता वाढविण्यासाठी हे खत उपयुक्त आहे. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
5