क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
पशुपालनअॅग्रोवन
जनावरांच्या खुरातील आजारावरील उपाययोजना
जनावरांमध्ये खुरांचे संसर्गजन्य आजार प्रामुख्याने आढळतात .या आजारांचा परिणाम जनावरांच्या दुध उत्पादनावर होतो गोठ्यातील दलदल व अस्वच्छता या गोष्टी खुरांच्या आजारास कारणीभूत ठरतात .
उपाय योजना – • जनावरांचे खुर कोरडे आणि स्वच्छ ठेवावे • गोठ्यातील मल-मूत्र वेळेच्या वेळी साफ करावे.गोठ्यात पाणी साठू देऊ नये.सांडपाण्याची निट व्यवस्था करावी. • गोठ्यामध्ये जाड भुश्याचे बेडिंग केले असता जनावरांचा शेन मुत्राशी संबध येत नाही.तसेच भुश्याच्या थरामुळे खुरांची साफसफाई अपोआप होते. • गोठ्याच्या स्वच्छतेबरोबरच खुरांचे आणि गोठ्याचे निर्जंतुकीकरण नियमित केल्यास खुरांचे आजार कमी होतात. • फूट बाथिंग करणे खुरांचे आजार टाळण्यास अत्यंत फायदेशीर ठरते • खुरांच्या आरोग्यामध्ये वेळच्या वेळी खुरे कापून घेणे हा महत्वाचा भाग आहे खुरांच्या झालेल्या कमी जास्त वाढीमुळे जनावरास सर्व पायावर संतुलन पेलणे कठीण जाते.त्यामुळे खुरांच्या आजारास जनावर लवकर बळी पडते. • एखादी गाई,जनावर लंगडत असल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. संदर्भ –अग्रोवन डिसे १७
46
0
संबंधित लेख