AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचे  !
पशुपालनAgrostar
जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचे !
🐄पशुधनाचे संगोपन करत असताना वेळेत प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण उपचारापेक्षा प्रतिबंध बरा जवळपास सर्वच साथीच्या रोगांमध्ये वेळेत योग्य उपचार न झाल्यास, जनावरे मृत्युमुखी पडण्याची संभावना असते. परंतु अजूनही काही भागांमध्ये पशुपालक जनावरांच्या लसीकरणाबाबत टाळाटाळ करताना दिसतात. लसीकरणाबाबत त्यांच्या मनात अनेक संभ्रम दिसतात. 🐄जनावरांना लस देण्याचे फायदे : 🐄काही ठराविक लस अशा आहेत, ज्या फक्त जनावर गाभण असताना आयुष्यात एकदाच दिल्या जातात. नंतर देऊन त्याचा काहीही फायदा होत नाही. जनावरांमध्ये गर्भपात होऊ नये, म्हणूनची लस गाय किंवा म्हैस गाभण असतानाच दिली पाहिजे. त्यामुळे गर्भातील वासराला देखील या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती मिळत असते. 🐄लस दिल्यानंतर जनावरांच्या शरीरावर तात्पुरता ताण येत असतो. त्यामुळे काही प्रमाणात दूध उत्पादनात घट दिसून येते. परंतु ती तात्पुरती असते. 🐄साधारणपणे कोणत्याही रोगाविरुद्ध लसीकरण केल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास तीन आठवड्यांचा कालावधी लागत असतो. या कालावधीत जनावरांना रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ठराविक रोगांचे ठराविक अंतराने प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणे गरजेचं आहे. 🐄पावसाळ्याच्या दृष्टीकोनातून जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेणं अत्यावश्यक आहे. लसीकरण करून पशुपालक भविष्यात जनावरांवरील उपचारांचा अतिरिक्त खर्च वाचवू शकतात. 🐄संदर्भ:-AgroStar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
5
इतर लेख