AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनावरांचे आरोग्य कसे जपावे.
पशुपालनAgrostar
जनावरांचे आरोग्य कसे जपावे.
🌱कालवडी या पुढील काळात दुध देणाऱ्या गाई होणार असतात आणि त्याचे योग्य व्यवस्थापन हा व्यवसायाचा पाया असतो.कालवडीच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास शारीरिकवाढ योग्य प्रमाणात होत नाही गर्भाशयाची वाढ योग्य प्रमाणात होत नाही त्यामुळे जनावर योग्य वयात माजावर न येणे,वांझ होणे हे आजार निर्माण होऊ शकतात त्यामुळे दोन वितातील अंतर वाढणे कमी दुध देणे हे आजार होतात हे आजार टाळण्यासाठी कालवडींना संतुलित सकस खनिज आणि जीवनसत्वयुक्त आहार द्यावा. ✔️ दुभत्या गाईंचा गोठा वेगळा असावा कासेतून दुधनिर्मिती होत असल्यामुळे कासेची काळजी घ्यावी.दुध दोहनाची जागा स्वच्छ असावी दुध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर कास स्वच्छ पाण्याने धुवावी त्यासाठी पोटॅशअम परमॅग्नेटचा पाण्यातून वापर करावा. ✔️ आठ मिनिटातच दुध काढण्याची क्रिया पूर्ण झाली पाहिजे अन्यथा दुध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो .कासदाह झालेल्या गाईचे दुध सरते शेवटी पिळावे म्हणजे दुसऱ्या गाई ना संसर्ग टाळता येईल. गव्हाणीत भरपूर चारा टाकावा म्हणजे गाई चारा खात राहते आणि गोठ्यात गाई बसणार नाही आणि सडांना जंतू संसर्ग होणार नाही ✔️ गोठ्यातील जमीन स्वच्छ ठेवावी मलमुत्राची वेळच्या वेळी विल्हेवाट लावावी गोठ्यातील घाणीमुळे डास,मच्छर,जंतू, गोचीड यांचा बंदोबस्त करावा. त्यामुळे जनावर अस्वथ होणे.खाण्यात लक्ष न राहणे चट्टे पडणे.हे आजार उद्भवतात. ✔️ गाईच्या दुधात कॅल्शीअम,फॉस्फारस,यांचा मोठ्या प्रमाणात निचारा होतो पर्यायाने त्यांची कमतरता उद्भवते त्याकरिता खाद्यात क्षारमिश्रीत आणि जीवनसत्वे अ यांचा समावेश असावा ✔️ जनावरांना गोठ्यात व्यायामासाठी फिरण्यासाठी भरपूर जागा असावी ✔️ जनावरांना पशुतज्ञाच्या शिफारशीनुसार जंतनाशक औषध पाजावे.फऱ्या,घटसर्प,लाळ खुरकुत नियंत्रणासाठी पशुतज्ञाकडून वेळच्या वेळी लसीकरण करून घ्यावे. 🌱संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख