AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जनधन खातेधारकांनो! बॅलेन्स नसतानाही मिळेल १० हजारांचा फायदा!
समाचारन्यूज १८ लोकमत
जनधन खातेधारकांनो! बॅलेन्स नसतानाही मिळेल १० हजारांचा फायदा!
➡️ जर तुमचेही जन धन खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. जन धन योजना खात्यात अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. केंद्र सरकार प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत शून्य शिल्लक बचत खाते उघडते. यामध्ये अपघात विमा, ओव्हरड्राफ्ट सुविधा, चेकबुकसह इतर अनेक फायदेही मिळतात. १० हजार रुपये कसे मिळवायचे जाणून घ्या? ➡️ जन धन योजनेंतर्गत, तुमच्या खात्यात शिल्लक नसली तरीही, १०,००० रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा अल्प मुदतीच्या कर्जासारखी आहे. पूर्वी ही रक्कम ५ हजार रुपये होती. सरकारने ती आता १० हजारांपर्यंत वाढवली आहे. काय आहे नियम? ➡️ या खात्यातील ओव्हरड्राफ्ट सुविधेसाठी कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमचे जन धन खाते किमान ६ महिने जुने असावे. तसे नसल्यास, फक्त २,००० रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट उपलब्ध आहे. जन धन खाते कसे उघडायचे? ➡️ प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जास्त खाते उघडले जाते. परंतु, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे जन धन खाते खाजगी बँकेत देखील उघडू शकता. तुमचे दुसरे बचत खाते असल्यास तुम्ही ते जन धन खात्यातही बदलू शकता. भारतात राहणारा कोणताही नागरिक, ज्याचे वय १० वर्षे किंवा त्याहून अधिक आहे, तो जन धन खाते उघडू शकतो. संदर्भ:- न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
70
7