समाचारलोकमत
जनधन अकाउंट घरबसल्या करा आधार शी लिंक, अन्यथा होईल 1.30 लाखांचे नुकसान !
आपले जनधन खाते असेल, तर लवकरच आपल्या आधार कार्डशी लिंक करा. हे खाते झिरो बॅलन्सवर कोणत्याही बँकेत सुरू करता येते. यामध्ये ओव्हरड्राफ्ट आणि रुपे कार्डसह विविध सुविधा मिळतात. दरम्यान हे खाते आधारशी लिंक नसल्यास मोठे नुकसान होऊ शकते. जसे की, या खात्यामध्ये, ग्राहकांना RuPay डेबिट कार्ड दिले जाते, ज्यामध्ये 1 लाख रुपयांचा अपघात विमा उपलब्ध आहे, परंतु जर आपले खाते आधारशी लिंक केले नाही, तर तुम्हाला हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुमचे एक लाख रुपयांचे नुकसान होईल. याशिवाय तुम्हाला या खात्यावर 30000 रुपयांचे अपघाती मृत्यू विमा संरक्षण देखील मिळते. जो बँक खात्याशी आधार लिंक झाल्यावरच उपलब्ध होते. अर्थात आधार कार्ड जनधन बँक खात्याशी लिंक नसल्यास तुम्हाला या 1 लाख 30 हजाराच्या फायद्याला मुकावे लागणार. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
5
इतर लेख