AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
जगातील सर्वात महागडे पदार्थ; किंमत वाचूनच येईल चक्कर!
खाना खजानाNews 18 lokmat
जगातील सर्वात महागडे पदार्थ; किंमत वाचूनच येईल चक्कर!
➡️ आपण चांगल्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये जाऊन खावं असं प्रत्येकाला वाटतं. मग एखादा पदार्थ खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागले तरी चालतील. कधी कधी अशा हॉटेल्समधील पदार्थांची किंमत वाचूनच आपण थक्क होतो. मग तर जगातीलअशाच महागड्या पदार्थांची किंमत वाचून तर तुम्हाला चक्करच येईल. ➡️ अमेरिकेच्या सेरेंडिपिटी रेस्टॉरंटमध्ये सर्वोत्कृष्ट ग्रिल्ड चीज सँडविच मिळतं. गोल्डन सँडविच म्हणूनही हे ओळखलं जातं. याची किंमत 16 हजार रुपये आहे. यावर सोन्याचा वर्क लावण्यात आला आहे. ➡️ जगातील सर्वात महागडे फ्रेंच फ्राइज 200 डॉलर्स म्हणजे जवळपास 14,916 रुपयांना आहे. अमेरिकेच्या सेरेंडिपिटी रेस्टॉरंटमध्ये क्रेमे डे ला क्रेमे पोमे फ्राइट्स नावाने हे फ्रेंच फ्राइझ मिळतात. यामध्ये ऑर्गेनिक जर्सी गायींपासून तयार केलेलं 100% क्रीम वापरण्यात आलं आहे. ➡️ नेदरलँडच्या डी डॉल्टन्स रेस्टॉरंटमध्ये पाच हजार पाउंड म्हणजेच 4.50 लाख रुपयांना एक बर्गर मिळतो. या बर्गरमध्ये सोन्याचं पान लावण्याच आलं आहे, याच कारणामुळे याची किंमत इतकी जास्त आहे. हे बर्गर द गोल्डन ब्वॉय नावानं प्रसिद्ध आहे. ➡️ जेवण झाल्यावर आपल्यापैकी बहुतेकांना आईस्क्रिम खायला आवडतं. जगातलं सर्वांत महागडं आईसक्रीम आहे 840 डॉलर्स म्हणजे सुमारे 60 हजार रुपयांना. दुबईत ब्लॅक डायमंड म्हणून मिळणाऱ्या या आईसक्रीममध्ये 23 कॅरेट खाण्यायोग्य सोनं आहे. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- News 18 lokmat, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
4
0
इतर लेख